शिरुर तालुक्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचा मोर्चा

सध्या युवतींवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असून साकींनाका येथील पिडीतेवरील झालेला अत्याचार तसेच राज्यामध्ये ७ दिवसांत ६ बलात्काराच्या घटना घडल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने कॅन्डल मार्च व निषेध मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करत पिडीतेला न्याय देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

शिक्रापूर: सध्या युवतींवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असून साकींनाका येथील पिडीतेवरील झालेला अत्याचार तसेच राज्यामध्ये ७ दिवसांत ६ बलात्काराच्या घटना घडल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने कॅन्डल मार्च व निषेध मोर्चा काढून सरकारचा निषेध व्यक्त करत पिडीतेला न्याय देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

एका जेष्ठ महिलेला चोरट्यांनी मारहाण अन...

 शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा कामगार आघाडी, युवा मोर्चा, युवा वॉरियर्स, ओबीसी मोर्चा यांच्या वतीने साकीनाका येथिल पिडीतेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच राज्यामध्ये ८ दिवसात झालेल्या सहा बलात्कारांच्या घटनांसंदर्भात आणि पिडीतेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

यावेळी भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, सचिव राजेंद्र ढमढेरे, पंचायत समिती सदस्य विक्रम पांचुदकर, विजयदादा रणसिंग, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब चव्हाण, शिरुर तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मांढरे, नवनाथ सासवडे, तालुका सरचिटणीस रघुनंदन गवारे, सरपंच आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र दोरगे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब दरेकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, युवा मोर्चाचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन गव्हाणे, सुरज चव्हाण, हर्षद जाधव, विशाल खरपुडे, संग्राम ढोकले, ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष भाग्यश्री गायकवाड, अंबादास कुरुंदळे, विद्याधर दरेकर, अशोक हरगुडे, केशव पाचर्णे, सतीश वडघुले, बाबुराव भोसुरे, रवी गव्हाणे, संदीप गवारे, हर्षवर्धन काळभोर, हरी नरके, विजय शिंदे, दिनेश राऊत, तेजस शिंदे, निलेश थोरात, लालू कातोरे, सुरज शिंदे, गणेश गवारे यांसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

दरम्यान भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव शेळके, पंचायत समिती सदस्य विक्रम पांचुदकर, विजयदादा रणसिंग, कैलासराव सोनवणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, भाग्यश्री गायकवाड यांनी तीव्र शब्दात मनोगत व्यक्त करत सरकारच्या निषेधार्थ व विरोधात घोषणा देत सरकारबाबत नाराजी व्यक्त करुन सरकार तसेच घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी साकीनाका येथील झालेल्या दुर्दैवी घटनेमधील युवतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस रघुनंदन गवारे यांनी केले तर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे यांनी आभार मानले.

कान्हुरच्या पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांनी घेतली वळसे पाटलांची भेट...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: BJP s front for the prohibition of atrocities