दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी शरद पवार गेले होते सायकलवरून...

एकदा जेजुरीत दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग...

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीला अभिनयाची वाट दाखवणारे 'नटसम्राट' पद्मविभूषण आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (व. 98) आज (बुधवार) सकाळी साडेसातच्या सुमारास काळाच्या पडद्याआड गेले. दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन...

दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच लाखो चाहत्यांच्या भावनांचा बांध फुटला. बॉलिवूड तसेच राजकीय क्षेत्रातून दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

शिरूर तालुक्यात नातवाने केली आजोबांची ठेचून हत्या...

शरद पवार म्हणतात की, 'एकदा जेजुरीत दिलीप कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. आम्हाला त्याची कुणकुण लागली. मग आम्ही मित्रांनी सायकली काढल्या आणि सायकलवरून प्रवास करत जेजुरी गाठली. त्यावेळी मला पहिल्यांदा लांबून का होईना दिलीप कुमार यांना पाहता आले. नंतर मी राजकारणात आलो. सरकारमध्ये विविध पदावर असताना दिलीप कुमार यांच्याशी माझा दोस्ताना झाला. ते लोकप्रिय आणि महान अभिनेते होतेच. पण माणूस म्हणूनही तितकेच ग्रेट होते.'  शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्याबाबतच्या आठवणी जागवल्या आहेत.

शिरुर तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ...

आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला.

शिरुर तालुक्यात महिलेला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: bollywood actor dilip kumar passes away sharad pawar says
प्रतिक्रिया (1)
 
MR. VILAS SALVE
Posted on 7 July, 2021

आपल्या बातम्या वाचुन छान वाटले व समाधान झाले. आपणास पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. आपला विलास साळवे नूतन महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी