जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी फुंकले रणशिंग...

कवठे येमाई - टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात अनेक जण इच्छुक

सध्या शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी- कवठे येमाई गणातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेससकडून इच्छुक असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोविडच्या माध्यमातून व विकास कामे करुन जोरदार तयारी केली आहे.

कवठे येमाई: आगामी काही दिवसात जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणुका जवळ आल्याने शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी- कवठे येमाई गणातून भावी उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहचण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश...

सध्या शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी- कवठे येमाई गणातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेससकडून इच्छुक असलेले माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र राजेंद्र गावडे यांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोविडच्या माध्यमातून व विकास कामे करुन जोरदार तयारी केली आहे. तर टाकळी हाजी गणातील विद्यमान पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे यांना मागच्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य पदासाठी डावलण्यात आले होते. त्यामुळे या वेळेस त्यांनीही वेगवेगळ्या कार्यक्रमात व विकास कामांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचून जोरदार तयारी केली आहे. तसेच थोडयाच दिवसात टाकळी हाजी गावातील ग्रामपंचायतीची निवडणुक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामूअण्णा घोडे यांच्यामध्ये असलेले मतभेद त्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता येईल याच्यावर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदाची समीकरणे अवलंबुन आहे.  

शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणार; ज्ञानेश्वर कटके
      
दुसऱ्या बाजूला कवठे येमाई गणातील शिवसेनेचे विदयमान पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाषराव पोकळे यांनी जिल्हा परीषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसली असून ते सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचत असुन त्यांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून आमदाबादचे अशोक माशेरे व टाकळी हाजीचे सावित्रा थोरात उमेदवारीसाठी तयारीत आहे. तसेच राष्ट्रवादीकडून टाकळी हाजीतील निवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे हे जिल्हा परीषद सदस्य पदासाठी इच्छुक आहे.   

युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवावी; शिवाजीराव आढळराव
       
पंचायत समिती सदस्य पदासाठी कवठे येमाई गणातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब डांगे, सविंदण्याचे वसंत पडवळ, उद्योजक रामभाऊ गायकवाड हे इच्छुक आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. परंतु आंबेगाव- शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात एकमत नाही. एकमेकांविरोधात कायमची टिकाटिपण्णी सुरु असते. त्यामुळे ही निवडणुक स्वतंत्र लढविली जाणार की कसे? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? कोणाला तिकीट देतात? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत भावी उमेदवारांची 'लगीणघाई' सुरु असून प्रचारासाठी गुढग्याला बाशींग बांधून जोरदार तयारी सुरु केली आहे.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'  
          
कोरोना महामारीच्या परिणामांना कंटाळलेल्या सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाला कोणत्याही मालाला बाजारभाव नसल्याने हलाखीचे दिवस सहन करावे लागत आहे. कोणते उमेदवार शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देतात? व कोणाला पसंती देतात? हे मात्र गुलदस्त्यात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Candidates for Zilla Parishad and Panchayat Samiti blew trum