लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं...? वाचा प्रियंकाचं उत्तर

प्रियंका चोप्रा २०१८ साली अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या ३ वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे. पण नेमकं काय बदललं?

मुंबई: प्रियंका चोप्रा २०१८ साली अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या ३ वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे. पण नेमकं काय बदललं?

कान्हुरच्या पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांनी घेतली वळसे पाटलांची भेट...

दरम्यान प्रियंकाने लग्नाबद्दल आणि लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत. लग्नापासून काय शिकलीस? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, एक गोष्ट जी लग्नानंतर मला समजलीये, ती म्हणजे माझ्या पार्टनरने माझ्या कामाला दिलेलं महत्त्व. मला एका लीडरची गरज होती आणि माझ्या पार्टनरच्या रुपात तो मला मिळाला आहे. निक त्याच्या करिअरसोबतच माझ्या करिअरलाही तितकंच महत्त्व देतो. मला कुठं जायचंय, काय आवडतं, या गोष्टींची काळीजी घेतो. मी वयाच्या १७  व्या वर्षी कामाला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत माझं कुटुंब अगदी पहाडासारखं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं आहे. माझ्या या कष्टाचं मोल करणाऱ्या पार्टनरची मला गरज होती. मी माझं करिअर बनवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. याचं कौतुक करणारा एक पार्टनर मला हवा होता आणि निकच्या रुपात तो मला मिळाला आहे. हे माझं नशीब आहे.

आमदार अशोक पवार यांचे सणसवाडीत अनोखे स्वागत

निकसोबतच्या लग्नाचा तुझ्या कामावर काय परिणाम झाला? असं विचारलं असता ती म्हणाली, निकने मला विशेष प्रभावित केले. आता मी खासगी आयुष्यात आणखी शांत झाले आहे. आधी मला लवकरच राग यायचा. पण आता मी ब-यापैकी रागावर नियंत्रण मिळवलं आहे. निक खूप शांत स्वभावाचा आहे. त्याच्याकडे प्रत्येक समस्येचा तोडगा असतो. तो डिप्लोमेट आहे आणि मी तिखट मिरची.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Change the name of the marriage after vacha priyankachan