मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले...

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनबन असल्याची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचे मुख्यमंत्री आज म्हणाले आहे.

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये अनबन असल्याची चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केले आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचे मुख्यमंत्री आज म्हणाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी, असा कधीच विचार केला नाही.'गेल्या काही दिवासांपासून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळावर निवडणुक लढविण्याचे भाष्य करत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रथमच यावर भाष्य केले आहे. 'कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ' असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोलेंना लगावला आहे.

सैफनं माझं आयुष्य बदललं पण शाहिदनं...

'माझी कारकिर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट, अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण, या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, २५ वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे', असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Chief Minister Uddhav Thackeray s big statement Said