शिरुर तालुक्यातील संयुक्त पथकांद्वारे होणार कंपन्यांची तपासणी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेवरुन प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिरुर तालुक्यातील कंपन्या आपत्ती व्यवस्थापन नियमांचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी संयुक्त पथकाची नेमणूक केली आहे.

कारेगाव: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सूचनेवरुन प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिरुर तालुक्यातील कंपन्या आपत्ती व्यवस्थापन नियमांचे पालन करतात की नाही हे तपासण्यासाठी संयुक्त पथकाची नेमणूक केली आहे.

कोरोनाच्या नियमांची राजकीय नेत्यांकडूनच पायमल्ली

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन विविध स्तरावर विविध उपाययोजना अमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुग्णांची संख्या कमी व्हावी. पुढील काळात येऊ घातलेल्या तिसर्या लाटेला आळा बसावा म्हणून रांजणगाव औद्योगिक वसाहत व सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये कंपन्या कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळतात की नाही हे पाहण्यासाठी एका संयुक्त पथकाची नेमणूक केली असून या पथकाने अचानकपणे कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी करायची आहे व दोषी आढळणार्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करायची आहे. या पथकामध्ये औद्योगिक विभागाचे उपसंचालक एस ए. शिंदे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, एमआयडीसीचे उपअभियंता सतीश चवडेकर, रांजणगाव गणपतीचे मंडलाधिकारी संतोष नलावडे यांची या पथकामध्ये नेमणूक केली आहे.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?
     
कोणत्याही कंपनीमध्ये जाऊन अचानक तपासणी करुन कंपन्या नियम पाळतात की नाही याची पाहणी करणार असून त्यामध्ये कंपनीच्या अंतर्गत भागात कामगार मास्कचा वापर करतात की नाही, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिग, कॅन्टीन मधील व सुलभ शौचालयातील आवश्यक उपाययोजना, कामगारांची स्वतंत्र वाहतूक त्यांच्या वेळोवेळी आरोग्यविषयक तपासण्या वगैरे कोरोना विषाणूंचा संसर्ग फैलावू नये या उद्देशाने करण्यात आलेले नियम न पाळणार्‍या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.

करंदीत नागरिकांकडून शासकीय नियम पायदळी तुडवून कार्यक्रम...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Companies will be inspected by joint teams in Shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे