Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन बैलांना न झेपल्याने कोसळले...

काँग्रेसच्या वतीने मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एक बैलगाडी आणण्यात आली. त्यात उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली.

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे वजन न पेलल्याने बैलगाडी पडल्यामुळे सगळेजण खाली कोसळले. काँग्रेसने गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र एकाच वेळी अनेक कार्यकर्ते गाडीत चढल्यानेमुळे ती कोसळली.

पेट्रोल-डिझेल नंतर आता CNG च्या दरातही वाढ...

देशात एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य जनतेच्या मनात याबाबत असलेल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मुंबईत बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एक बैलगाडी आणण्यात आली. त्यात उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’, अशा घोषणा देत होते. मात्र, त्याचवेळी दोन बैलांपैकी एका बैलाला त्यांचे वजन पेलणे कठीण होऊ लागले. काहीवेळाने तर बैल या गाडीपासून वेगळा झाला आणि बैलगाडी पलटी झाली. त्यामुळे बैलगाडीत उभे असलेले काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते एका क्षणात गाडीतून रस्त्यावर पडले.

दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर कोसळल्याने काहीजणांना किरकोळ मुका मार तर काहीजणांना खरचटले आहे. सर्वात खाली पडलेला एक कार्यकर्ता सुरुवातीला काही वेळ झोपून राहिला. त्यामुळे त्याला काही गंभीर इजा झाली असावी, असा संशय क्षणभरासाठी भाई जगतापांसह सर्वांनाच आला. मात्र काही क्षणातच हा कार्यकर्ता उठल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि हसतखेळत, घडलेल्या प्रसंगाची मजा लुटत कार्यकर्ते आंदोलनाच्या पुढच्या तयारीला निघून गेले.

सत्य हे नेहमी कटूच असते:- माजी सरपंच अनिल नवले

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: congress workers collapsed form a bullock cart at mumbai vid