कोरोनाच्या नियमांची राजकीय नेत्यांकडूनच पायमल्ली

सर्वसामान्य नागरीकांना दंड तर राजकीय नेत्यांना सूट...?

कोरोनाच्या बचावासाठी तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. अशा परीस्थितीत शिरुर तालुक्यातील राजकीय नेते मात्र शासनाच्या नियमांना हरताळ फासत स्वतःच हे नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का...? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

शिरुर: सध्या शिरुर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शासनाने सुद्धा हळूहळू अनलॉकची प्रक्रिया चालू केली असुन सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळत आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही कायम आहे. कोरोनाच्या बचावासाठी तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. अशा परीस्थितीत शिरुर तालुक्यातील राजकीय नेते मात्र शासनाच्या नियमांना हरताळ फासत स्वतःच हे नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का...? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?

कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणारा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन रांजणगाव MIDC पोलीस आता काय भुमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. नुकताच शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर (पाटील) यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांचा वाघाळे येथे काही ग्रामस्थांनी सत्कार केला. परंतु या सत्कारा दरम्यान १४ जण एकत्र आले होते. तसेच त्यातील फक्त २ जणांनी तोंडाला व्यवस्थित मास्क लावलेले दिसत असुन ५ जणांचे मास्क हे नाकाच्या खाली दिसत आहेत. आणि उरलेल्या ७ जणांनी मास्कच लावलेले नाहीत. यावेळी शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे आणि रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर पाटील हे दोघेही फोटोत दिसत आहेत.

कोरेगाव भीमा येथे शासकीय नियम तुडविले पायदळी

हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन सर्वसामान्य लोकांनाच कोरोनाचे नियम आहेत का...? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु असुन मानसिंग पाचुंदकर हे गृहमंत्री दिलीपराव वळसे (पाटील) यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता सर्वसामान्य लोकांनी मास्क न लावल्यावर तातडीने कारवाई करणारे रांजणगाव MIDC पोलीस या राजकीय नेत्यांच्या बाबतीत कडक भुमिका घेणार का...? हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे. काही दिवसांपुर्वी एका नवीन कारची पूजा करताना सोशल डिस्टन्स न पाळता गर्दी केल्याने कार मालकावर शिक्रापुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता रांजणगाव MIDC पोलीस या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखवणार का...? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरीक विचारत आहेत.

Title: Corona s rules were trampled on by political leaders
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे