ग्रामपंचायत मतमोजणी प्रत्येक गावातच मतदान केंद्रावर करा

महागणपती केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव पाचुंदकर यांची मागणी

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायतीचे वारे जोरात वाहू लागले असुन गाव पुढाऱ्यांपासुन ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक शुक्रवार (दि. १५)जानेवारी रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणी ही १८ जानेवारी रोजी शिरुर येथे होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी शिरुर शहरात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते निवडणूक निकालासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे.

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यात ग्रामपंचायतीचे वारे जोरात वाहू लागले असुन गाव पुढाऱ्यांपासुन ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूक शुक्रवार (दि. १५)जानेवारी रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणी ही १८ जानेवारी रोजी शिरुर येथे होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी शिरुर शहरात तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते निवडणूक निकालासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहे.

दोन अपक्ष उमेदवारांनी दर्शविला ग्रामविकास पॅनलला जाहीर पाठींबा

Image may contain: 1 person, text that says
       
शिरुर शहरात हजारोंच्या संख्येने येणाऱ्या लोकांची गर्दी होणार असुन यामुळे कोरोना विषाणूंचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सदर मतमोजणी ही मतदान आहे त्याच दिवशी प्रत्येक गावातच मतदान केंद्रावर करावी, अशा मागणीचे निवेदन श्री महागणपती केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव पाचुंदकर यांनी शिरुर तहसीलदार यांना दिले आहे.

Image may contain: text that says

...तर १ फेब्रुवारीपासुन रेशन होणार बंद
       
दिलेले निवेदनाद्वारे तहसील प्रशासनाने राज्य निवडणूक आयोग मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करुन त्यांना परिस्थितीची जाणीव करुन द्यावी जेणेकरुन लोक हे त्यांच्याच गावात राहतील व शिरुर शहरात गर्दी होणार नाही, असे नामदेव पाचुंदकर यांनी सांगितले.

Image may contain: text that says

Title: Count the Gram Panchayat votes at the polling station in eve
प्रतिक्रिया (1)
 
नामदेवराव सखाराम पाचुंदकर पाटील
Posted on 10 January, 2021

धन्यवाद...

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे