Death: जुन्नर तालुक्यात पतसंस्थेत गोळीबार व्यवस्थापकाचा मृत्यू

कांदळी येथे अनंत पतसंस्थेत भर दुपारी सशस्त्र हल्ला

पुणे-नाशिक (Pune-Nashik) महामार्गा (highway) लगत असणाऱ्या कांदळी (ता. जुन्नर) येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी (cooperative) पतसंस्थेमध्ये आज दुपारी दिडच्या सुमारास २ अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करुन व्यवस्थापक राजेंद्र भोर (Rajendra Bhor)यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. त्यात राजेंद्र भोर यांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला आहे.

जुन्नर: पुणे-नाशिक (Pune-Nashik) महामार्गा (highway) लगत असणाऱ्या कांदळी (ता. जुन्नर) येथील अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी (cooperative) पतसंस्थेमध्ये आज दुपारी दिडच्या सुमारास २ अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करुन व्यवस्थापक राजेंद्र भोर (Rajendra Bhor)यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. त्यात राजेंद्र भोर यांचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला असुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे अडिच लाख रुपयांची रोख रक्कम लुटून नेली आहे.

Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

आज दुपारी दीडच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आल्या आणि त्यांनी पतसंस्थेत प्रवेश करत राजेंद्र भोर यांना बंदुकीचा धाक दाखवुन धमकी देत पैशाची मागणी केली. यावेळी व्यवस्थापक भोर यांनी पतसंस्थेत पैसे नाही असे सांगताच दोघांपैकी एकाने भोर यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे भोर हे खुर्चीच्या खाली कोसळले. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे.

Murder: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला कुऱ्हाडीसह अटक

कांदळी येथील अनंत पतसंस्था येथे हल्ला केल्यानंतर काही वेळातच पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ भोर, गणेश नेहरकर, सुभाष भोर व प्रशांत भोर, जितेंद्र भोर यांनी जखमी राजेंद्र भोर यांना तात्काळ उपचारासाठी नारायणगाव येथील  खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी राजेंद्र भोर यांना मृत घोषित केले.

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

May be an image of 1 person

दरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गिट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तसेच अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी व राजकीय व्यक्तींनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत पोलीस तपास चालू असून ग्रामीण भागात अशा प्रकारे दिवसेंदिवस पतसंस्था बँका लुटीचे प्रकार घडत चालल्यामुळे पतसंस्थांच्या व बँकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करत पैसे लुटून नेताना चे सीसीटीवी फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असुन  घटनास्थळी गोळीबार केल्यानंतर गोळीची कॅप मिळाली आहे. यावेळी दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस फौजदार राजेश पवार तसेच श्वानपथक फिंगरप्रिंट तज्ञ पथक घटनास्थळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Death Junnar Talukyat Patsansthe