शिरुर तालुक्यात देवेंद्र सामाजिक वृक्ष सप्ताहाची सुरुवात...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना विविध फळ झाडांचे वाटप

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे तालुक्यातील सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या संकल्पनेतून "देवेंद्र सामाजिक वृक्ष सप्ताह" या उपक्रमाची सुरुवात शिरुर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप करुन करण्यात आली.

शिक्रापूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे तालुक्यातील सर्व जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या संकल्पनेतून "देवेंद्र सामाजिक वृक्ष सप्ताह" या उपक्रमाची सुरुवात शिरुर तालुक्यातील डिंग्रजवाडी येथे शेतकऱ्यांना फळ झाडांचे वाटप करुन करण्यात आली.

बारा बलुतेदार महासंघच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भगवान श्रीमंदिलकर

निवडणुकांपुरते राजकारण न करता जनतेपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना काळात गरीब व गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप, निराधार महिलांना शासनाच्या विविध योजना घरपोच देत त्यांना सहकार्य करणे. तसेच शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात सामाजिक संदेश देणारे फलक लावणे अशा अनेक सामाजिक उपक्रमांत जयेश शिंदे कार्यतत्पर असुन वृक्षलागवडीचा अनोखा उपक्रम साजरा करत शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.  

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना शासनाने मदत द्यावी...

यावेळी बोलताना जयेश शिंदे म्हणाले की, भारतात दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, शहरीकरण, आणि इतर सुविधांकरीता जंगलांची मोठया प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. त्यामुळे झाडांचे प्रमाण कमी झाले असुन त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फळझाडांचे वृक्षारोपण व संगोपन करण्यासाठी एक मोठी चळवळ उभी करण्यात येत असुन या फळझाडांचा उपयोग वातावरणातील ऑक्सिजन बरोबर शेतकऱ्यांना झाडांना फळे लागल्यानंतर आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना उच्चप्रतीचे आंबा, चिंच, जांभूळ, सिताफळ, पेरु अशा अनेक फळझाडांचे वाटप केले असुन जवळपास ६५० शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी ५ झाडे देऊन ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग त्वरित लागु करा अन्यथा...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Devendra Social Tree Week begins in Shirur taluka