दिवसाढवळ्या घराचा लोखंडी दरवाजा तोडून दागिने चोरी

पाबळ (ता. शिरुर) येथील पिंपळवाडी येथे दिवसाढवळ्या घराचा लोखंडी दरवाजा ढकलून घरात प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील पिंपळवाडी येथे दिवसाढवळ्या घराचा लोखंडी दरवाजा ढकलून घरात प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरूर तालुक्यात टेम्पो चालकाचे अपहरण करुन लुटणारे जेरबंद

पाबळ (ता. शिरुर) येथील पिंपळवाडी येथे राहणारे गणेश बगाटे यांच्या घरातील व्यक्ती (दि. ३) ऑक्टोबर रोजी घराचा दरवाजा ढकलून शेजारी काम करत असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश करुन घरातील दागिने चोरुन नेले काही वेळाने बगाटे हे घरात आले असताना त्यांना घरातील कपाट उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटामध्ये पाहणी केली असता सोन्याचे साडेतीन तोळे वजनाचे दागिने  व चांदीचे काही दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत गणेश पंढरीनाथ बगाटे (वय ४२) रा. पाबळ पिंपळवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय चौधर हे करत आहे.

पिंपळे जगताप मध्ये किरकोळ कारणावरुन दोन गटात हाणामारी

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Divadhavya gharacha Lokhandi door todoon daagine theft