एका जेष्ठ महिलेला चोरट्यांनी मारहाण केली अन...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ४ चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घराच्या आतील खोल्यांच्या कड्या बाहेरुन लावत ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन सोण्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ४ अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ४ चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घराच्या आतील खोल्यांच्या कड्या बाहेरुन लावत ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन सोण्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ४ अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शंकर जांभळकर यांची तब्बल १५ गावांमध्ये आरोग्यसेवा

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजेनगर येथील आकाश गायकवाड व त्यांचे वडील दिलीप गायकवाड हे रात्रीच्या सुमारास घरातील बेडरुम मध्ये झोपलेले असताना रात्री २ वाजण्याच्या सुमारात ४ अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करुन घरातील आतील दोन्ही बेडरुमला बाहेरुन कड्या लावल्या. यावेळी घरात झोपलेल्या गायकवाड यांची आजी लताबाई यांचे तोंड दाबून धरुन आजीला हातोडीने मारण्याची धमकी देत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

दरम्यान भयभीत झालेल्या आजीने आरडाओरडा केल्याने आकाश गायकवाड हे उठले मात्र बाहेरून कड्या असल्याने त्यांनी दरवाजा तोडून बाहेरील खोलीत आले असताना भयभीत झालेल्या आजीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याबाबत आकाश दिलीप गायकवाड (वय २६) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात ४ जणांवर जबरी चोरीचा गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके हे करत आहे.

सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Eka Eldest Female Chortyani Marhan An