फॅक्ट चेक : कोरोना लस घेतल्यानंतर वस्तू कशा चिकटतात? घ्या जाणून...

खरचं अशा वस्तू चिकटतात का? लसीमुळे खरंच अशाप्रकारे चुंबकीय शक्ती निर्माण होऊ शकते काय? हा व्हिडिओ खरा आहे की खोटा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवी दिल्ली: नाशिक येथील एका व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरावर वस्तू चिकटत असल्याचा दावा केला होता. संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत होता. नागरिकांमध्ये यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, खरचं अशा वस्तू चिकटतात का? लसीमुळे खरंच अशाप्रकारे चुंबकीय शक्ती निर्माण होऊ शकते काय? हा व्हिडिओ खरा आहे की खोटा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांना केंद्र सरकारच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरो या संस्थेने उत्तर दिले असून, याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.

Video: मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून लाजली नवरी....

लसीमुळे चुंबकीय शक्ती? PIB म्हणते…
'लसीकरणामुळे चुंबकीय शक्ती निर्माण झाल्याचे दावे पूर्णपणे निराधार आहेत' असं PIB ने स्पष्ट केले आहे. शिवाय, 'कोरोना लस शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण करू शकत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लसी या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच या लसी बनवताना त्यामध्ये कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही.' असं देखील स्पष्ट केलं आहे.

'लसीबाबत खोटी व निराधार माहिती पुरवणाऱ्यांवर विश्वास न ठेवता विषाणू संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण करून घ्या' असे आवाहनही PIB ने केले आहे.

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे अर्थात सीडीसीने यापूर्वीच चुंबकीय शक्ती निर्माण होत असल्याचे दावे साफ खोटे असल्याचं स्पष्ट केले आहे.

वरुडेमधील मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिला मदतीचा हात!

व्हायरल व्हिडीओमध्ये लोकांच्या शरीराला धातूच्या वस्तू कशा चिकटतात?
तज्ज्ञांच्या मते मानवी शरीरावरील त्वचा तेलकट असल्यास शरीराला काही वस्तू चिकटतात. अंगावर घाम असेल तरी देखील असे होऊ शकते. काहीजण प्रसिद्धीसाठी क्लुप्त्या आजमावून देखील असे व्हिडिओ तयार करू शकतात अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

कोरोनाचे साईड इफेक्ट्स कोणते?
तुमच्या शरीरामध्ये जेव्हा अँटीजेन (ऍटिबॉडीज निर्माण करण्यासाठी रक्ताला उत्तेजित करणारा पदार्थ) सोडले जातात तेव्हा तुमच्या शरीराने त्याला दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच साईड-इफेक्ट्स. अँटीजेन शरीरात प्रवेश करताच तुमचे शरीर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होते.

प्रथम पांढऱ्या पेशी त्याच्याशी लढा देतात. यासोबतच काहींना लस घेतल्यानंतर ताप, थकवा, स्नायू दुखणे, वेदना, थंडी वाजणे अशा तक्रारी जाणवू लागतात. हे लसीचे 'कॉमन' अर्थात सामान्य साईड-इफेक्ट्स म्हणून देखील ओळखले जातात.

तर काहींमध्ये यापेक्षा वेगळे साईड-इफेक्ट्स देखील पाहायला मिळतात.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: fact check corona vaccine and body paste coin video viral bu