अतिक्रमणचा ताबा देण्यासाठी बनावट कागदपत्रे...?

शिरुरच्या नायब तहसिलदारांचा प्रताप उघड

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मोजणीसाठी असणाऱ्या नियमांचा आधार घेत खोटी बनावट कागदपत्र तयार करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमण दाखवून जमीचा ताबा दिल्याचा अतिशय गंभीर प्रकार शिरुर तहसीलदार यांच्या कार्यालयात घडल्याचे समोर आले.

मांडवगण फराटा: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मोजणीसाठी असणाऱ्या नियमांचा आधार घेत खोटी बनावट कागदपत्र तयार करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमण दाखवून जमीचा ताबा दिल्याचा अतिशय गंभीर प्रकार शिरुर तहसीलदार यांच्या कार्यालयात घडल्याचे समोर आले असून या कामात चक्क नायब तहसीलदार पदावर काम करीत असलेले ज्ञानदेव  यादव यांनीच सदर प्रकार केल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने पुणे येथील उपविभागीय अधिकारी तसेच  विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे  केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

मांडवगण फराटा येथील वाल्मिक महादेव फराटे आणि गंगुबाई महादेव फराटे यांच्या मालकीच्या गट नं . २५६/१, २५६/२ या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी अतिअति तातडीच्या सरकारी मोजणीमध्ये मोजणी करून निघालेल्या अतिक्रमणाचा ताबा देण्यासाठी बोगस कागदपत्रांमध्ये पोलीस बंदोबस्त मिळणेसाठी द्यावयाचे  पत्र, मंडल अधिकारी याना  ताबा देण्यासाठी उपस्थित राहाण्याबाबतचा आदेश आणि ज्या शेतकऱ्यांकडे अतिक्रमण निघाले आहे. त्या शेतकऱ्यांना द्यावायाचे नोटिसा इत्यादी सर्व काही बोगस आणि बनावट तयार करून संगनमताने अतिक्रमणाचा ताबा दिल्याच्या तक्रारी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्याकडे तक्रारदार अलका बबन शेलार, गोपीचंद सदाशिव फराटे, या शेतकऱ्यांनी केल्या असून यामधील मास्टर माईंड नायब तहसीलदार यादव असून या अधिकाऱ्याला विभागीय अधिकारी पुणे यांनी कारणे दाखवा नोटिस बजावून यादव यांचेकडून  खुलासा मागून घेतला आहे.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?

या प्रकारामध्ये मांडवगण फराटा येथील वरील गट नं.ची हद्दनिश्चित मोजणी असताना खोटा, बनावट इ बोगस आदेश वापरून अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमण निश्चित झालेले नसताना ताबा देणेसाठी दिवाणी न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्रकारामध्ये बेकायदेशीर अधिकारच वापर झाल्याची बाब उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर निदर्शनास आली असून यावर आता काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.  

शिरुर तालुक्यातील संयुक्त पथकांद्वारे होणार कंपन्यांची तपासणी

तहसिलदार यांच्या सहीचा गैरवापर...?
मांडवगण फराटा येथील अतिक्रमणाचा ताबा मिळवण्याबाबत नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांनी त्यांना कुठलाही अधिकार नसताना तहसिलदार म्हणून माझ्या बनावट  सह्या करून पोलिस बंदोबस्तासाठी मला न विचारता सदर आदेश काढले असून त्यांनी आपल्या पदाचा  गैरवापर केला आहे. माझ्या सहीचा गैरवापर हे ज्ञानदेव यादव यांनी केलेले अत्यंत चुकीचे काम आहे.यादव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई होण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दोन दिवसांत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे तहसिलदार लैला शेख यांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" शी बोलताना सांगितले.

तहसीलदार लैला शेख यांचे भय अधिकाऱ्यांना नाही का ?

शिरूर तालुक्यातील रेशनिंग प्रकरणात  नायब तहसिलदार  ज्ञानदेव यादव हे कायम वादग्रस्त राहिले असून मागील वर्षी त्यांनी  रेशनिंग दुकानावर मुद्दाम कारवाई केली नसल्याचे येथील नागरिकांमधून बोलले जात होते. परंतु आता पुन्हा त्याच गावात घडलेली घटना अतिशय गंभीर असून मागील वेळेप्रमाणे पुन्हा यादव यांच्यावर कारवाई होणार कि त्यांचा पुन्हा प्रशासनाकडून बचाव होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्रमश :

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Fake documents for possession of encroachment
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे