प्रसिद्ध अभिनेत्रीचा माजी मंत्र्यावर लैंगिक शोषण अन् गर्भपाताचा आरोप

एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चेन्नई: एका प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला असून, दोघांचे सोबतचे काही फोटो पुरावे म्हणून सादर केले आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून, पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यातील मेव्हणीला खूश करण्यासाठी केले नको ते कृत्य...

संबंधित पीडित अभिनेत्री ही तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अण्णा द्रमुकचे माजी मंत्री डॉ. मणिकंदन यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिने मागील काही वर्षांपासून डॉ. मणिकंदन यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा दावा केला आहे. ही अभिनेत्री मुळ मलेशिया या देशाची असून मागील काही वर्षांपासून ती तमिळ चित्रपटसृष्टीत काम करत आहे.

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; शिवाय...

पीडित अभिनेत्री 2017 मध्ये प्रथम मणिकंदन यांना भेटली होती. तेव्हापासूनच दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात मणिकंदन यांनी लग्नाचे आमिष दाखवून संबंधित अभिनेत्रीशी अनेकदा शारीरिक संबंधही ठेवले. गेल्या पाच वर्षापासून त्यांचे संबंध सुरू होते. अभिनेत्रीने लग्नाबाबत विचारले तेव्हा मणिकंदन यांनी लग्न करण्यास नकार दिला, असे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

Image

मोठी बातमी! दहावीचा निकाल 'असा' लागणार...

मणिकंदन यांच्या प्रेमसंबंधातून गर्भवती राहिले असताना, जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्याच बरोबर घटनेची वच्याता कुठेही केली, तर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी मणिकंदन यांनी दिली असल्याचे अभिनेत्रीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवाय पुरावा म्हणून तिने मणिकंदन यांच्यासोबतचे काही फोटोही पोलिसांना दिले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

Image

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: famous actress accuses former minister of harassment he also
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे