लॉकडाऊनमध्ये शिक्षिका आणि अल्पवयीन विद्याथ्याने काढला पळ...

शाळेतील शिक्षिका १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला घेऊन फरार झाली आहे.

पानीपत (हरियाणा): पानीपत शहरात शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका खासगी शाळेतील शिक्षिकेने १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याला घेऊन फरार झाली आहे. पानीपतच्या देशराज कॉलनीतील एका खासगी शाळेत ती शिक्षिका शिकवायला होती. शिक्षिका घटस्फोटीत महिला असून, ती माहेरीच राहायला होती.

तळेगाव ढमढेरे येथे एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थ्याच्या वडिलांनी जिल्हा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, 'माझा मुलगा २९ मे रोजी दुपारी २ वाजता महिला शिक्षिकच्या घरी क्लाससाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. मुलगा ११ वीच्या वर्गात होता. शिक्षिका क्लास टीचर आहे. शिक्षिकेच्या घरच्यांनी सुरुवातीला यावर काही तास उलटल्यानंतरही काहीच केले नव्हते. त्यानंतर शिक्षिकेच्या वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार नोंदवली.

कवठे येमाई येथे शेतीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून

May be an image of text

शिक्रापूरमध्ये पोलिसांची गाडी मद्यपी पोलिस चालकाच्या हाती...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुन्हा नोंद केला असून, शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. परंतु अद्याप दोघांचाही पत्ता लागलेला नाही. विद्यार्थी गेल्या २ वर्षापासून शिक्षिकेच्या घरी शिक्षण घेण्यासाठी जात होता. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थी दिवसातून ४-५ तास शिक्षिकेच्या घरी क्लाससाठी थांबत होता. त्यानंतर २९ मे रोजी दोघेही अचानक गायब झाले आहेत. घरामधील कोणतीही वस्तू ते घेऊन गेले नाहीत. केवळ शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे. पुढील तपास सुरू आहे.'

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

Image

शिक्रापूरमध्ये महिलेला मारहाण करत विनयभंग

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: feamel teacher run away with minor student at panipat haryan
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे