अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश...

शिक्रापुर गावाची कचरा मुक्तीकडे वाटचाल

शिक्रापूर गावातील कित्येक वर्षाचा कचरा हटविणे गरजेचे असताना अखेर शिक्रापुरातील अनेक वर्षाचा कचरा उचलला जात असल्याने शिक्रापूरची कचरा मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा प्रश्न काही केल्या संपत नसताना कचरा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना गावातील कित्येक वर्षाचा कचरा हटविणे गरजेचे असताना अखेर शिक्रापुरातील अनेक वर्षाचा कचरा उचलला जात असल्याने शिक्रापूरची कचरा मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.

शिवसेना सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविणार; ज्ञानेश्वर कटके

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कचरा समस्या सोडविण्यासाठी अनेक नागरिकांनी प्रयत्न केलेले असून वेळप्रसंगी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला असताना वरिष्ठ कार्यालयांकडून ग्रामपंचायतला वेगवेगळे आदेश देखील काढण्यात आले आहे. मात्र काही केल्या शिक्रापूर गावातील कचरा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात असताना अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने गावामध्ये तात्पुरत्या स्वरुपात कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असून गावातील अनेक वर्षांचा गोळा झालेला कचरा हटविणे गरजेचे असल्याने अखेर पुणे येथील कचरा प्रकल्प चालकाशी ग्रामपंचायत प्रशासनाने चर्चा करुन गावातील सर्वच कचरा उचलून नेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

युवकांनी व्यवसायात सचोटी ठेवावी; शिवाजीराव आढळराव

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

शिक्रापूर गावातील सर्व कचरा उचलून नेण्याच्या कामास नुकतीच सुरुवात झाली आहे. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, युवा सेनेचे विजय लोखंडे, जितेंद्र काळोखे, मंगेश चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी सिकंदर शेख यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यावेळी बोलताना सदर सर्व कचरा येथून हटविल्यानंतर लगेचच गावातील कचरा प्रकल्पाच्या कामाला सुरवात केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Finally the success of the Gram Panchayat office bearers