विनायक चतुर्थी निमित्त श्री महागणपती ला १२१ डझन केळींचा महानैवेद्य

श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान येथे शनिवार (दि ९) रोजी विनायक चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक व १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. युवा उद्योजक व गणेशभक्त शुभम नवले यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व १२१ डझन केळींचा महानैवेद्य करण्यात आला.

रांजणगाव गणपती: शासनाने दिलेल्या आदेशानुसार (दि. ७) ऑक्टोबर रोजी मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान येथे शनिवार (दि ९) रोजी विनायक चतुर्थी निमित्त पहाटे अभिषेक व १२ वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला. युवा उद्योजक व गणेशभक्त  शुभम नवले यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट व  १२१ डझन केळींचा महानैवेद्य करण्यात आला.

खैरेनगर मध्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप

यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे , पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी उपस्थित होते.

काँग्रेस सेवादल प्रत्येक निवडणुकीत उतरणार: अशोक भुजबळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिराची पूर्णपणे साफ सफाई केलेली असून सामाजिक अंतर राखण्यासाठी ६ फुटावर खुणा केलेल्या आहेत. संपूर्ण मंदिरामध्ये सॅनिटायझरची फवारणी केलेली असून भाविकांना मास्क बंधनकारक आहे. सॅनिटायझरचा वापर करुनच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच विनायक चतुर्थीचे औंचित्य साधून रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर प्रभाकर आडवळे यांचे वतीने १०० लिटर सॅनिटायझर देण्यात आले.

पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG-PNG महागले...

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी आंबेगाव- शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे  विश्वस्त  नारायण पाचुंदकर पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य रघुनाथ ढोबळे, शांताराम ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: For Vinayaka Chaturthi Sri Mahaganpati La 121 Dzhen Kechinch