शारिरीक संबंध ठेवताना ती अपमानकारक बोलली अन्...
कारेगाव येथे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने केला खून
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना शारीरिक सबंधातून प्रेयसी गरोदर राहिल्यामुळे प्रेयसी व प्रियकर यांच्यात गर्भ खाली करण्यावरुन सतत वाद होत होते. तसेच शारीरिक संबंध ठेवताना अपमानकारक बोलल्यामुळे प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीचा गळा आवळुन खून केल्याची घटना घडली असुन खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.कारेगाव: कारेगाव (ता. शिरुर) येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना शारिरीक सबंधातून प्रेयसी गरोदर राहिल्यामुळे प्रेयसी व प्रियकर यांच्यात गर्भ खाली करण्यावरुन सतत वाद होत होते. तसेच शारीरिक संबंध ठेवताना अपमानकारक बोलल्यामुळे प्रियकराने रागाच्या भरात प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
ते हॉटेल मध्ये आले अन पोलिसांच्या जाळ्यात अडकले
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि १४) सायंकाळी ६:३५ वाजता एक व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आली. त्यावेळेस तेथे ठाणे अंमलदार म्हणून पोलीस नाईक गणेश सुतार व मदतनीस म्हणून विजय शिंदे ड्युटी बजावत होते. त्यावेळेस आलेल्या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव किरण फुंदे (रा. राजगड प्लाझा, दुसरा मजला रुम न. ३३ कारेगाव) असे सांगितले. तसेच त्याने एक कोरा कागद व पेन मागितला. त्यावर त्याने "सर मी टेंशन डिप्रेशनचा पेशंट आहे. त्यामुळे या अवस्थेत माझ्याकडुन एक खून झाला असून मी माझ्या प्रेयसीचा गळा दाबून जीव घेतला आहे. कृपया मला फाशी द्या " असा मजकूर लिहून तो कागद पोलिसांकडे दिला. तसेच मी रुमला बाहेरुन कुलूप लावून आलो आहे, असे सांगत रुमची चावी पोलिसांकडे दिली.
शिरूर तालुक्यात डॉक्टरने केली महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी...
त्यानंतर ठाणे अंमलदार गणेश सुतार यांनी तात्काळ मदतनीस असलेले पोलीस शिपाई विजय शिंदे यांना रुमची चावी देत राजगड प्लाझा येथे जाऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी पोलीस गेले असता एक २४ वर्षीय युवती मयत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी व माझी प्रेयसी सोनामनी कान्हू सोरेन (वय २४) गेले ४ ते ५ महिन्यापासून कारेगाव येथील राजगड प्लाझा येथील रुम नं ३३ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो. त्यावेळेस शारीरिक संबंधातून माझी प्रेयसी गरोदर राहिली. परंतु, आम्हाला ते बाळ नको होते. परंतु बाळ खाली करण्यास भरपुर पैसे लागणार होते. आमच्या दोघांकडे पैसे नसल्याने आमचा कायम वाद होत होता.
शुक्रवारी (दि १४) दुपारी ३ वाजता शारीरिक संबंध ठेवताना सोनामनी अपमानकारक बोलली. त्यामुळे राग आल्याने त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी फिर्याद दिली असून, आरोपी किरण बाळासाहेब फुंदे याच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात भा द वि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करत आहेत.
दरम्यान, रांजणगाव पोलिसांनी संशयित आरोपीस न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयित आरोपीतर्फे वकील किरण रासकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
तीन बायका अन् फजिती ऐका प्रकरण मिटवायला निघालेत गावकारभारी...!
Appa misal
Posted on 16 August, 2020Khup chan