लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री...

ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा त्यांना आधार मिळाला त्यांचे ही आभार मानले आहे. व आपला आनंद शेअर केला आहे. तर अजूनही आपले बाळ आयसीयुमध्ये असल्याचेही तिने म्हटले आहे.

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा हिचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर तीन महिन्यात ती आई झाली आहे. दियाने उद्योजक वैभव रेखीसोबत दुसरे लग्न केले होते.

Good News : लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली दिया मिर्झा; बाळाचा पहिला PHOTO केला शेअर

दिया आणि वैभव यांना पुत्ररत्न झाले आहे. विशेष म्हणजे दियाच्या बाळाचा जन्म 14 मेलाच झाला होता. कारण ते बाळ 9 महिन्यांआधीच जन्माला आले होते. तर ते प्रेमॅच्युअर बेबी म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. तर आता दियाने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे. दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत माहिती दिली. ज्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा त्यांना आधार मिळाला त्यांचे ही आभार मानले आहे. व आपला आनंद शेअर केला आहे. तर अजूनही आपले बाळ आयसीयुमध्ये असल्याचेही तिने म्हटले आहे. दियाने तिच्या मुलाच नाव अव्ह्यान आझाद रेखी असे ठेवले आहे.

दरम्यान, दिया गर्भवती असताना तिला काही इन्फेक्शन झाले, त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. जे तिच्या जीवावरही बेतू शकले असते, असे दियाने पोस्टमध्ये म्हटले आहे. पण वेळवर डॉक्टरांनी उपचार करत सिझरिंग पद्धतीने बाळाला जन्म दिला. त्यामुळे 6 व्या महिन्यातच बाळ जन्माला आले. दियाने आणखी मोठी पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान दिया आणि वैभव यांनी 16 फेब्रुवारी 2021 रोजी विवाह केला होता.

सैफनं माझं आयुष्य बदललं पण शाहिदनं...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: good news from actress dia mirza as she becomes mother the a