कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना शासनाने मदत द्यावी...

कोरोनामुळे पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

रांजणगाव गणपती: कोरोनामुळे पतीचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने करण्यात आली असुन याबाबत संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केला आहे. तर शिरुरचे नायब तहसिलदार श्रीशैल वट्टे आणि शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांना निवेदन दिले आहे.

मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला...

शिरुर तालुक्यात कोरोनामुळे विधवा झालेल्या अनेक महिलांनी आपली व्यथा रामलिंग महिला उन्नती संस्थेकडे मांडली असून शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. कोरोना मुळे तालुक्यात ४०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे कुटुंब प्रमुखाचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंब संकटात सापडले आहे. कुटुंबाचा भार विधवा महिलेवर येऊन पडला असल्याने कमवता पुरुष गेल्याने कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आहे. आपल्या पाल्याचे संगोपन कसे करावे हा प्रश्न विधवा महिलांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे या महिलांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या असून पतीचे निधन झाल्याने त्यांचे पुढील जीवन अंधकारमय झाल्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यांना मदत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

कोरोनामुळे ज्या ० ते १८ वयोगटातील बालकांचे दोन्ही पालक मृत पावले आहेत अशा बालकांच्या संगोपनासाठी या बालकांच्या नावे शासनाने ५ लाख रुपये मुदत ठेव जमा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. मात्र शासनाने कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचाही सहानभूतीपूर्वक विचार करुन त्यांनाही मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यांना मदत मिळावी म्हणून संस्थेने मुख्यमंत्र्यांना निवेदन मेल केले आहे. शिरुर हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनाही मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारांनी फुंकले रणशिंग...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही याबाबत मेल करण्यात आला आहे. यावेळी आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी शहा उपस्थित होत्या. मुख्यमंत्री आमच्या मागणीची निश्चित दखल घेतील याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास राणी कर्डिले यांनी व्यक्त केला आहे.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Government should help widows who lost their husbands due to