अंत्यसंस्कारादरम्यान मुलाला कवटळातच झाला चमत्कार...

मुलाची आई जान्हवी आणि आजी अन्नू या रडत होत्या. वारंवार मुलाच्या मृतदेहाला कवटाळून परत ये असं हंबरडा फोडत होत्या.

चंदीगड (हरियाणा): एका सहा वर्षाच्या मुलाला डॉक्टरांनी मृष घोषित केले. यानंतर कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मुलाचा मृतदेह डोळ्यासमोर पाहून आईने जोरात हंबरडा फोडला. मुलाला कुशीत घेऊन जोरजोरात रडू लागली. पण, त्यानंतर जे काही झाले ते पाहून सगळ्यांना धक्काच बसला.

Video: मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून लाजली नवरी....

मुलाच्या शरीरात हालचाल होऊ लागली. तत्काळ त्याला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने त्याच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. मंगळवारी रोहतकच्या हॉस्पिटलमधून तो उपचार घेऊन पुन्हा हसत-खेळत घरी परतला आहे. ही घटना हरियाणाच्या बहादूरगड परिसरातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या हितेश आणि त्यांची पत्नी जान्हवी यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला टायफॉईड झाला होता. त्याच्या उपचारासाठी त्याला दिल्लीला नेण्यात आले होते. २६ मे रोजी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह घेऊन आम्ही बहादूरगडला परतलो होतो.

Video: नवरी राहिली बाजूला मेहुणीनेच मारला चान्स...

मुलाचे आजोबा विजय शर्मा म्हणाले, 'नातवाचा मृतदेह रात्रभर ठेवण्यासाठी बर्फ आणि सकाळी दफन करण्यासाठी मिठाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी गर्दी झाली. मुलाची आई जान्हवी आणि आजी अन्नू या रडत होत्या. वारंवार मुलाच्या मृतदेहाला कवटाळून परत ये असं हंबरडा फोडत होत्या. काही वेळात मृतदेहाच्या शरीरात हालचाल जाणवली. वडील हितेश यांनी मुलाच्या चेहऱ्यावरील चादर हटवली आणि त्याला तोंडातून श्वास देऊ लागले. शेजारील सुनीलने मुलाची छाती दाबण्यास सुरुवात केली आणि अचानक मुलाने तोंडातून श्वास देणाऱ्या वडिलांच्या होटावर दाताने पकडले.

Video: बापरे! कोंबडा आणि कुत्र्याची तुफान फायटिंग...

या घटनेनंतर २६ मे रात्रीच त्याला रोहतकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मुलाच्या वाचण्याचे केवळ १५ टक्के चान्स आहेत, असे डॉक्टर म्हणाले. उपचार सुरू झाले. वेगाने मुलगा बरा होऊ लागला. त्यानंतर आता पूर्णपणे बरा होऊन मंगळवारी तो घरी परतला आहे. मुलाचे आजोबा विजय शर्मा यांनी हा चमत्कार असल्याचे सांगितले. गावात घडलेल्या या घटनेमुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नवरा-बायकोची Kiss घेण्याची रंगली स्पर्धा; Video पाहाच...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: hayrana news dead boy alive after his mother cry and come