ही आमची हार आहे; चित्रा वाघ यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबईच्या साकीनाका परिसरात काल एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती.

मुंबई: मुंबईच्या साकीनाका परिसरात काल एका ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य केले होते. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

शिक्रापूरच्या आयानने साकारला इको फ्रेंडली बाप्पा...

चित्रा वाघ म्हणाल्या की, 'आम्ही यात काहीही करु शकलो नाही. आम्ही भाषणं देण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काहीही करु शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख आहे' अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 'खरंतर मी नि:शब्द झालेय. माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या राक्षसी पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाले. मी तिला बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. तिच्या गुप्तांगात रॉड टाकला गेला. हे कुठेतरी थांबायला हवं. आता आमचे शब्द संपले, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सरकारला, व्यवस्थेला सांगायचे आहे. असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

शिक्रापूरात तक्रार निवारणदिनी १२५ तक्रारींवर कार्यवाही

गेल्या ८ दिवसांत १३ वर्षांच्या मुलीवर १४ लोकांनी बलात्कार केला, ६ वर्षांच्या मुलीवर रिक्षात बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळी अमरावतीत १७ वर्षांच्या ७ महिन्यांच्या गर्भवती मुलीवर बलात्कार झाला, तिने गळफास लावून संपवून घेतलं. साकीनाक्यातली ही महिला मृत्यूशी झुंज देत होती. आम्ही यात काही करु शकलो नाही. आम्ही भाषणं करण्यापलीकडे, घोषणा देण्यापलीकडे काही करु शकलो नाहीत. ही हार आहे आमची आणि याचंच मला दु:ख आहे. अशी प्रतिक्रिया वाघ यांनी रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Hey aamchi defeat came Chitra Wagh Yanchi Emotional Reactio