चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

आपण अर्धी शिक्षा भोगली आहे. आपलं वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत...

रांची (झारखंड): चारा घोटाळा प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा जामीन आज (शनिवार) झारखंड उच्च न्यायालयानं मंजूर केला आहे. या निर्णयानंतर आता लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Video: कोरोनाबाबत शरद पवार यांच्याकडून आवाहन...

दुमका कोषागारमधून अवैधरित्या 3.13 कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील 3 प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says

लालू प्रसाद यादव यांचे वकील देवर्षि मंडल यांनी सांगितले की, 'कोरोनाची स्थिती लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठाने दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर आरजेडी नेते लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी याआधीदेखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र, लालू प्रसाद यादव यांनी दिलासा मिळाला नव्हता.'

...अन् शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्याची झाली बोलती बंद!

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

'रेमडेसिवीर मिळत नसेल तर काळजी करू नका; हे औषध घ्या...'

'आपण अर्धी शिक्षा भोगली आहे. आपलं वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा,' असे लालू प्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते.

Title: high court grants bail to lalu prasad yadav in fodder scam c
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे