गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

शिरुर तहसिलदारांच्या पतीने फोनवरून नायब तहसिलदारांना दम दिल्याचे झाले उघड

शिरुरच्या तहसिलदार यांनी तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामातील कारवाई केलेल्या वाळूच्या गाडया सोडून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून त्याचा भांडाभोड नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे यांनी लेखी पत्राद्वारे केला असून वरिष्ठांकडुन अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

शिरुर: शिरुरच्या तहसिलदार यांनी तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामातील कारवाई केलेल्या वाळूच्या गाडया सोडून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून त्याचा भांडाभोड नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे यांनी लेखी पत्राद्वारे केला असून वरिष्ठांकडुन अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तसेच या प्रकरणी तहसिलदार यांचे पती  परशूराम दिवानाड हे नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांना फोनवरून कन्नड भाषेत  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कलेक्टर साहेब यांच्याकडे तुझी तक्रार करेल तसेच प्रसारमाध्यमांमध्ये माझी फार मोठी ओळख असून मी तुझी वाट लावेल अशा प्रकारची धमकी दिली आहे.

सावकारकीला कंटाळून मागितली सामूहिक आत्महत्येची परवानगी

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरीकंडून होत आहे. तसेच तहसिल कार्यालयामधील अनेक कामे प्रलंबित असून नांगरीकांची प्रंचड हेळसांड होत आहे. याकडे वरीष्ठ आधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असुन शिरुर तहसिल कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबाबत राजकीय नेते, वरीष्ठ आधिकारी काय भुमिका घेतात आणि त्यांच्यावर कधी कारवाई करतात याकडे शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. (क्रमशः)

करंदीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कोरोनाचा विसर...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Home Minister Dilip Vase Patlaunch Nao Gheun Dila Dum