करंजावणे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना मान्यवर

शिरुर तालुक्याचे सालकरी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या माजी आमदार कै. बाबुरावजी दौंडकर यांच्या करंजावणे गावातील रस्त्याचा प्रश्न जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे गावातील नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्याचे सालकरी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या माजी आमदार कै. बाबुरावजी दौंडकर यांच्या करंजावणे गावातील रस्त्याचा प्रश्न जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित होता. त्यामुळे गावातील नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

अतिक्रमणचा ताबा देण्यासाठी बनावट कागदपत्रे...?

शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी ग्रामस्थांची हीच अडचण ओळखून करंजावणे ते देवाचीवाडी या रस्त्यासाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असुन मंगळवार (दि ८) रोजी आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

यावेळी शिरुर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर राजे निंबाळकर, राजेंद्र गिरमकर करंजावणे गावचे सरपंच शांतीदेव शिंदे, पोलीस पाटील आबासाहेब शेलार, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम शेलार, राष्ट्रवादी युवा नेते प्रशांत दौंडकर, युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष स्वप्नील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Honorable while inaugurating the road work at Karanjawane
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे