ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग त्वरित लागु करा अन्यथा...

जातीनिहाय जनगणना त्वरित करुन समाजास न्याय द्यावा; कल्याणराव दळे

रोहिणी आयोग हा ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग असून तो त्वरित लागू करावा, अशी मागणी राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषद व १२ बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली.

उस्मानाबाद: रोहिणी आयोग हा ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग असून तो त्वरित लागू करावा, अशी मागणी राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषद व १२ बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केली.

शाळा सुधार निधीच्या नावाखाली हजारो रुपये उकळल्याचे समोर

कल्याणराव दळे पुढे म्हणाले कि, ओबीसी महामंडळाचा सर्वाधिक लाभ कोणी घेतला याची आकडेवारी माझ्याकडे आहे. माझा १२ बलुतेदार समाज लाभापासून वंचित राहिला असून हा १२ बलुतेदार यांच्यावर झालेला सामाजिक, राजकीय अन्याय आहे. यासाठी ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना त्वरित करुन समाजास न्याय द्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शिरुर तालुक्यातील नावारुपाला आलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेतून होतेय पालकांची लुट
           
कल्याणराव दळे यांच्या रुपाने राज्याला दूसरे कर्पूरी ठाकुर मिळाले, असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरजी अंसारी यांनी केले. रोहिणी आयोग केंद्र सरकारने लागू करावा व ओबीसी च्या गणनेनुसार त्यांना त्यांचा वाटा द्यावा यासाठी १ कोटि सह्यांचे पत्र देशाचे राष्ट्रपति व प्रधानमंत्री यांना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी राज्यातील १२ बलुतेदार, अलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी असलेल्या वंचित ओबीसिंचा चिंतन मेळावा उस्मानाबाद येथे संपन्न झाला. राज्यातील वंचित ओबीसी समाज हे माझ घर आहे आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला न्याय मिळवून देणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे व ती जबाबदारी पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे प्रतिपादन ओबीसी नेते कल्यानराव दळे यांनी केले.

कोंढापुरी येथे सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून वृक्ष वाटप...

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषद व १२ बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरजी अंसारी यांच्या शुभ हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेशजी चव्हाण, फकीरा दल प्रमुख सतिषजी कसबे, प्रजा सुराज्य पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी राऊत, १२ बलुतेदार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, धनंजयजी शिंगाड़े, राजेन्द्रजी बागुल, उत्तमराव सोलाने, रविभाऊ कोरे, मुकुंदजी मेटकर, लक्ष्मणराव माने, बाळासाहेब खोत, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, याचिकाकर्ते विकासराव गवळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रस्ताविक धनंजय शिंगाड़े यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कोळी यांनी मानले.

...अन अनाथ सोनीला मिळाला आयुष्यभराचा जोडीदार

ओबीसी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयन्त केला जात आहे; विकास गवळी
सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च २०२१ च्या निकालामध्ये स्पष्ट सांगितले आहे की स्वतंत्र समर्पित आयोगाची  निर्मिती करावी. ओबीसीं ची जातीनिहाय जनगणना करुन इम्पेरिकल डाटा सादर करावा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ४ मार्च रोजी लागला तर राज्य सरकारने ३ मार्च रोजीच जुनाच आयोग पुनर्गठित करुन ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहे. यांना ओबीसी समाजास आरक्षण द्यायचे आहे कि नाही, असा प्रश्न उभा राहतो आहे.

शिरूर तालुक्यातील २४ गावात ६४ कोरोना बाधित रुग्ण दोघांचा मृत्यू

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Immediate implementation of the commission giving justice to