Reshning: रेशनबाबत केंद्र सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

अजुन चार महिने मोफत मिळणार तांदुळ आणि गहू

केंद्र सरकारच्यावतीने (central government) रेशन (Reshning) दुकानात मिळणाऱ्या गहू-तांदळा बद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला असुन पुढचे आणखीन चार महिने नागरिकांना गहू (wheat) आणि तांदुळ हे मोफतच दिले जाणार आहे.

मुंबई: केंद्र सरकारच्यावतीने (central government) रेशन (Reshning) दुकानात मिळणाऱ्या गहू-तांदळा बद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला असुन पुढचे आणखीन चार महिने नागरिकांना गहू (wheat) आणि तांदुळ हे मोफतच दिले जाणार आहे. मार्च २०२२ पर्यंत आहे त्याच दरात ह्या अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा नुकतीच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक घेण्यात आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

Murder: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीला कुऱ्हाडीसह अटक

School: शिरुर तालुक्यातील देशात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय शाळेचा अखेर पदार्फाश

गेले दिड वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना पाच किलो गहू-तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. ही योजना गेल्या १५ महिन्यांपासून सुरू आहे. आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असुन डिसेंबर २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Shikrapur Police: शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ...?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Important decision of the Central Government regarding the R