दाढी वाढवलेल्या अभिनेत्याला ओळखणे चाहत्यांसाठी मुश्‍कील...

अजय देवगण त्याच्या स्टायलिस्ट लूकमुळे गेल्या २ दशकांपासून खूप चर्चेत असतो. मात्र, अलीकडे कोरोनाच्या काळात त्याचा लूक एवढा बदलला आहे की त्याला ओळखणे देखील खुप कठीण झाले आहे.

मुंबई: अजय देवगण त्याच्या स्टायलिस्ट लूकमुळे गेल्या २ दशकांपासून खूप चर्चेत असतो. मात्र, अलीकडे कोरोनाच्या काळात त्याचा लूक एवढा बदलला आहे की त्याला ओळखणे देखील खुप कठीण झाले आहे. त्याचा हा बदललेला लूक मधील फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये पिकलेल्या लांब दाढीमिशांमधील त्याच्या फोटोवर त्याच्या फॅन्सनी खूप कमेंट केल्या आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तब्बल १६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती...

अजयने आतापर्यंत मिशा वाढवल्या होत्या. मात्र दाढी कधीही वाढवलेली नव्हती. त्यामुळे या दाढीवाल्या लूकमध्ये त्याला चाहत्यांना ओळखता सुद्धा येत नाही. या दाढीवाल्या लूकमध्ये अजयला बघितल्यावर अजयच्या फॅन्सना वेगळीच शंका यायला लागली होती. तो आजारी असल्याचे अनेकांना वाटले. पण तो पूर्णपणे स्वस्थ आहे आणि ही वाढवलेली दाढी म्हणजे लॉकडाऊनचा परिणाम आहे.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

शिरुर तालुक्यातील 'या' गावातील युवकांनी जागविल्या मयत मित्राच्या स्मृती...

अजयने हा लूक त्याच्या आगामी 'थॅंक गॉड'साठी राखून ठेवला आहे. अजय त्याच्या भूमिकेवर नेहमीच खूप कष्ट घेत असतो. त्यामुळेच त्याच्या लूकबाबतही त्याने कसोशीने दाढी वाढवण्याचे ठरवले आहे. अलीकडेच अजयचा 'टोटल धमाल' रिलीज झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: It is difficult for fans to recognize the bearded actor