जातेगाव खुर्दमध्ये दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपासून नागरिकांना दोन बिबट्यांचे दर्शन होत असताना शिरुर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आलेला असताना अखेर (दि. १३) रोजी सकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला असून सदर बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपासून नागरिकांना दोन बिबट्यांचे दर्शन होत असताना शिरुर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आलेला असताना अखेर (दि. १३) रोजी सकाळच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला असून सदर बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

आमदार अशोक पवार यांचे सणसवाडीत अनोखे स्वागत

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होऊन या भागामध्ये एकाच वेळी २ बिबटे दिसून येत असल्याने नागरिकांच्या मागणीनुसार शिरुर वनविभागाच्या वतीने जातेगाव खुर्द येथील तांबे वस्ती येथे ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता, आज सकाळच्या सुमारास महेश मासळकर यांचे वडील रमेश मासळकर हे शेतात गेलेले असताना त्यांना बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला असल्याचे निदर्शनास आले.

अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम...

घटनेची माहिती मिळताच शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भाडळे, सर्पमित्र शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेतली दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यावेळी नागरिकांना शांततेचे आवाहन करत बिबट्याला नागरिकांच्या मदतीने शिरुर वनविभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करत जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान; लुसि कुरियन

यावेळी जातेगाव खुर्दचे उपसरपंच विकास मासळकर, पोलीस पाटील कृष्णा गाजरे, माजी सरपंच समाधान डोके, ग्रामपंचायत सदस्य महेश मासळकर, गणेश मासळकर, प्रवीण मासळकर, गणेश तांबे, प्रवीण कौटकर, गोरक्ष तांबे, ऋषिकेश तांबे, सचिन तांबे, भूषण घोलप, अभिजित मासळकर, संजय मासळकर, ज्ञानेश्वर तांबे, संग्राम चव्हाण, माउली मासळकर, सुहास मासळकर, समीर मासळकर, शहाजी मासळकर यांसह आदी उपस्थित होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक संतोष शिंदे, प्रताप कांबळे यांनी देखील सदर ठिकाणी धाव घेत गर्दीवर नियंत्रण आणून नागरिकांना शांततेचे आवाहन केले, दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाने पुन्हा पिंजरा लावून दुसऱ्या बिबट्याला देखील पकडून नेण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहे.

रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान; लुसि कुरियन

बिबट्याला जुन्नर येथे दाखल केले आहे; बबन दहातोंडे
जातेगाव खुर्द येथे पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या अंदाजे दीड वर्षाचा असून सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले आह. तसेच ग्रामस्थांच्या मागणी नुसार सदर ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची व्यवस्था केली जाईल, असे वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Jaategaon Khurdmedhe Disnara Bibatya Akher Jaraband