पत्रकारीता; मानवी मुल्यांची जोपासना

कोरोना सारख्या महामारीच्या काळात पत्रकार हा पहिल्या फळीतील एका योध्या सारखा लढला. समाज्याच्या रक्षणा करीता कोणतेही अमिष न बाळगता अनेकांनी आपला जीव ओवाळून टाकला. कोरोनाचा बळी ठरलेल्या पत्रकारांची कुटुंब वाऱ्यावर आलं पण सरकारने दुर्लक्ष केलं. या महासंकटातुन जाताना लोकशाहीचा चौथा स्थंभ आणि त्याचे शिलेदार अर्थात पत्रकार डगमगून न जाता नव्या उमेदीने पुन्हा लोकशाहीच्या रक्षणासाठी उभा राहत आहे. त्यास समाजाने सन्मान तर शासनाने साहाय्य दिलेच पाहिजे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात पत्रकार हा पहिल्या फळीतील एका योध्या सारखा लढला. समाज्याच्या रक्षणा करीता कोणतेही अमिष न बाळगता अनेकांनी आपला जीव ओवाळून टाकला. कोरोनाचा बळी ठरलेल्या पत्रकारांची कुटुंब वाऱ्यावर आलं पण सरकारने दुर्लक्ष केलं. या महासंकटातुन जाताना लोकशाहीचा चौथा स्थंभ आणि त्याचे शिलेदार अर्थात पत्रकार डगमगून न जाता नव्या उमेदीने पुन्हा लोकशाहीच्या रक्षणासाठी उभा राहत आहे. त्यास समाजाने सन्मान तर शासनाने साहाय्य दिलेच पाहिजे.

दररोज ३० मिनिटं सायकल चालवाल तर...
                     

वृत्तपत्र, नभोवाणी व दूरचित्रवाणी ही माध्यमे समाज मनाची दर्पण आहेत. यातुन समाज्याची जडण घडण निर्माण होते. मुक्त आणि निर्भय माध्यमामुळे लोकशाही टिकली. त्यामुळे लोकशाही विकासात प्रसार माध्यमांना महत्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्ती साठी अनेक महात्म्यांनी लेखणी झिजवली. वेळ प्रसंगी तुरुंगवासही भोगला. स्वातंत्र्य व समाज सुधारणा पत्रकारितेचा हा मूळ उद्देश अंगीकृत होता. त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणुन माध्यमांना सन्मान मिळाला. या शिवाय विशिष्ठ अधिकारही मिळाले. स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतर अनेक वृत्तपत्र व दूरचित्रवाणी बरोबर मोबाईल सारखीही सामाजिक माध्यम पुढे आली. हे सारे होत असताना विपुल, विस्तृत, विविधांगी, निपक्ष, निर्भीड स्वरुपाच्या वृत्तांताची गरज आहे. ती दिसते का कुठे...? असा प्रश्न सामान्य जनतेला पडतो. तेंव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी आरंभ करुन दिलेल्या पत्रकारितेच्या मुल्ल्यांची आठवण पत्रकार दिनानिमित्त करुन दिली पाहिजे.

Image may contain: 1 person, text that says
                      
प्रसार माध्यमे ही प्रबोधनची साधने आहेत. ती जास्त प्रमाणात करमणुकीचे साधने ही आहेत का...? असे वाटू लागले आहे. दूरचित्र वाण्यांवरुन वादग्रस्त वायफळ चरच्या एकूण काय चाललंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हेच का...? असा कधी प्रश्न निर्माण होतो. कोरोनाच्या संकटातून चित्रवाणी व्यवस्थित आहे. पण प्रिंट मीडिया अर्थात वृत्तपत्र सध्या अडचणींचा सामना करत आहे. मोबाईल हे संकट आहे कि काय...? सोशल मीडिया मार्फत पसरवल्या जाणाऱ्या वृत्तांची विश्वासहर्ता तपासली पाहिजे. त्यामुळे एक वाचन संस्कृती ही मागे पडत चालली आहे. प्रसार माध्यमांची शक्तीस्थळे ही वाचनालये आहेत. आज ती बंद होताना दिसत आहे. वृत्तपत्र सध्या कोरोना संकटाने कमी होत आहे. हे समाज जागृती दृष्टीने घातकच आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीला सर्वांगीन दृष्ट्या सशक्त बनवायचे असेल तर आधी मोबाईल बाजुला ठेव आणि वृत्तपत्रक हाती घे ही वाचन संस्कृती रुजवावी लागेल.

पोलीस नोकरी गेली अन ग्रामपंचायतचे स्वप्न ही भंगले...
                 
१८१८ साली अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याच्या हातुन घेत संपुर्ण देशभर ब्रिटिश अंमल सुरु केला. पारतंत्र्यात गेलेला हिंदुस्थान आणि प्रचंड सामाजिक विषमता दोन्ही घटक देशाच्या स्वातंत्र्यात अडसर ठरत होते. पारतंत्र्यात गेल्याने ब्रिटिशांच्या औद्योगिक धोरणाने कारागीर बेकार झाले होते. संस्थाने खालसा करण्याचा लागलेला सपाटा त्यात त्यामुळे उपासमार, अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी भारतीय समाज खोकला झाला होता. आता खरी नवचैतन्याची गरज होती. समाज जागरुक करावयाचा असेल तर वृत्तपत्राची गरज भासू लागली. यातुनच ६ जानेवारी १८३१ साली 'दर्पण' नावाच्या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी केली. यातुन 'पाहा आपले प्रतिबिंब, अन मगच ठरवा' या मथळ्याचा अग्रलेख खुप गाजला आणि स्वातंत्र्य चळवळीचे महत्व पटू लागले. शास्त्री हे इतिहासाचे संशोधक होते, ते संस्कृत पंडित, पत्रकार, साहित्यकार, या शिवाय ते आद्य समाजसुधारक होते. त्यामुळे स्त्री मुक्ती चळवळ, सती प्रथा, बाल विवाह, केशवपन, अस्पृश्यता निवारण यांना हद्दपार तर विधवा पुनर्विवाह साठी त्यांनी दर्पण मधुन प्रोत्साहन दिले.

शेतकरी महिलेचा विनयभंग करत मारहाण तर...
             
आज २१ व्या शतकात प्रसार माध्यमांची प्रचंड चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे नितीमूल्य पायदळी तुडवले जात आहे. परंतु स्वातंत्र्य काळात प्रसार माध्यमांची महत्वाची भूमिका होती. महात्मा फुले यांनी धर्मव्यवस्थेच्या गुलाम गीरीतुन भारतीय समाज शहाणा करण्यासाठी शुद्र, अतिशुद्र, स्त्री शिक्षण, यांना उचित सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी बालविवाह, भ्रूणहत्त्या, केशवपन या प्रथा मोडून काढण्यास तसेच शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक त्यांची दुर्दशा संबंधी कारणांचे विश्लेषण 'दीनबंधू' मधून प्रकाशित केली. अनिष्ठ प्रथा, स्त्री स्वातंत्र्य विषयी, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतुन अनेक पत्रिका व वृत्तपत्रे जन्माला आली त्यांनी समाजासमोर सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तसाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शुद्र, अतिशुद्र, मागास वर्ग, शेतकरी, मजूर,यांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांनी १९३० मूकनायक, तर त्या पाठोपाठ बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत तर जनता वृत्तपत्रातून ''गुलामाला गुलामीची जाणीव करुन द्या, म्हणजे तो बंड करुन उठेल '' हे घोषवाक्य घेऊन गुलामीत जखडलेल्यानां जागे केले. 
      
समाज सुधारणाबरोबर स्वातंत्र्य चळवळीला महत्व देणारी ही अनेक वृत्तपत्रे निघाली. त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असंतोष व असहकार निर्माण केला. १८८१ साली टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी केसरी हे वृत्तपत्र काढले. यातुन सरकारचे डोके ठिकाणावर आहे का...? असा अग्रलेख लिहून स्वातंत्र्याची बीजे रोवली जाऊ लागली. त्यामुळे 'केसरी' वृत्तपत्रास जनमानसाने सातत्याने प्रातिनिधिकरीत्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिले. पुढे त्यांनी मराठा हे वृत्त पत्र सुरु केले असेच स्वातंत्र्य चळवळीत 'हिंदुस्थान गदर' नावाच्या पत्रिकेने ब्रिटिशांविरोधी अंसतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्रिटिश सैन्यात असलेल्या हिंदू सैनिकांत असंतोष निर्माण करण्याचे काम केले हि पत्रिका उर्दू, पंजाबी भाषेत निघत. या साप्ताहिकाची मराठी अनुवाद करुन वाटण्याची जबाबदारी विष्णू गणेश पिंगळे या मराठी क्रांतिकारकावर होती अशी अनेक वृत्तपत्रे आता देश्याच्या स्वातंत्र्य चळवळीत उतरली होती. यात १८६६ सालचे अरुणोदय मधून ब्रिटिश सरकारला विरोध तर  सामाजिक व राजकीय प्रश्नावर अधिक भर दिला तर १८९८ साली शि. म. परांजपे यांनी 'काळ' वृत्तपत्राची सुरुवात झाली. त्यातुन राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. याच काळात देशात स्वातंत्र्य व समाजसुधारणा यान केंद्रस्थानी ठेवत वृत्तपत्रे निघू लागली. यातुन सामाजिक व स्वातंत्र्याचा हेतू शुद्ध ठेवला असल्याचे दिसते. त्यानंतर ही वसा आणि वारसा जपणारी वृत्तपत्रे निघाली आणि टिकली देखील.

शिक्रापुरातील रक्त सांडलेल्या बेवारस कारचा लागला छडा...
     
भारतात ब्रिटिशांनी पहिले इंग्रजी वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. तर मुंबईत बाँबे हेरल्ड १७८९ साली सुरु झाले आणि पाहता पाहता आज भारतात एकूण वृत्तपत्रांची संख्या १९९७ साली दैनिक व साप्ताहिक अशी ४१ हजार ७०५ वृत्तपत्रे होती. तीच २०१५ साली १ लक्ष ५४४३ हजार होती. रिडिओ ची प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे झाली. सध्या ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात. रेडिओ वरुन अनेक भाषणे होत असत. जगात, देशात, राज्यात होत असलेल्या घडामोडी ऐकण्यास मिळत असे. यात शेतकरी, कामगार वर्गासाठी विशेष कार्यक्रमांबरोबर करमणूक व बातमी पत्रे असत. भारतात १९५९ साली दूरचित्रवाणीने पाऊल ठेवले आणि १९९२ नंतर खासगी वाहिन्यांचा प्रवेश केला. दूरदर्शन ही एक मात्र सरकारी वाहिनी ते आज ९०० च्या आसपास खासगी दूरचित्रवाणीचा शिरकाव झाला. त्या बरोबर मोबाईल व कॉम्पुटर वापरातुन फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, युटयूब सारखी अनेक सोशल मीडिया नावांची माध्यम सुरु झाली आणि प्रत्येक नागरिकाचा यातुन मुक्त पत्रकारितेचा प्रवास सुरु झाला.

कलियुगातील गाडगेबाबाची कहाणी माहिती आहे का?
     
भारत स्वातंत्र्य अगोदर ब्रिटिश हेच वृत्तपत्रांचे शत्रू होते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भांडवलदार, कारखानदार, उद्योजक, नेते, गुन्हेगार, तस्कर या शिवाय नोकरशहा सुद्धा पत्रकारांचे शत्रू बनले. सत्यता बाहेर आणताना नकळत अंकुश लादला जाऊ लागला. या भीतीने अनेकांनी पत्रकारांचा खून केला. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची आकडेवारी २०१२ ते २०१८ या सालांत राज्यात ४२० पत्रकारांवर हल्ले झाले. यातुन काहींनी मृत्यू स्वीकारला तर काहींच्या वाट्याला कायमचे जायबंदी पण आले. सार आयुष्य तारेवरची कसरत करत समाज मन आणि समाज भान जपत मानवी मुल्य टिकवण्याचे कार्य निस्वार्थी अहोरात्र करत असतो. हे करताना जीवे मारण्याच्या धमक्या, खोटे गुन्हे यात अडकवले जाते. ग्रामीण भागात गौणखनिजे व वाळू उत्तखनन, अश्या महसूल चोऱ्या करणाऱ्यांकडून प्रशासनातील नोकरा बरोबर पत्रकारांना जीव गमवावा लागला आहे. हे हल्ले होताना पत्रकार आणि आम्ही वेगवेगळे आहेत अशी भूमिका समाजातील संवेदनशील माणसांनी घेतली तर लोकशाही धोक्यात येईल. माध्यमांवर हल्ला होताना ही लढाई त्यांनीच लढली पाहिजे ही भूमिका चुकीची ठरणारी आहे. या बाबत पत्रकारांच्या संरक्षणासाठी एप्रिल २०१७ मध्ये राज्यात संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला. व ८ डिसेंबर २०१९ ला राज्यात लागू झाला.  असे असताना आता सत्त्यता व विश्वासहर्ता टिकवण्याची जबाबदारी आता अखंडपणे पार पाडावी लागणार आहे.

Image may contain: text that says
     
भारतात स्वातंत्र्यप्राप्ती नंतर वृत्तपत्रे व्यवसायिक होऊ लागली आणि पैसा हेच माध्यम बनविले. अनेक पक्षांनी आपली दुकानदारी चालवण्यासाठी वृत्तपत्रे व चॅनेल सुरु केले. आपल्या विचारांची बातमी आणि जाहिरातींची बातमी असे समीकरण जुळू लागले. अनेकांनी पोटभरु पत्रकारिता आरंभीली त्यामुळे बातमी मागची बातमी अर्थात शोध पत्रकारिता दुरापस्त होऊ लागली. चॅनलवर तर अक्षरशः एका धार्मिक निकालावर चर्चेस बोलविणाऱ्यां मध्ये भांडणे लावून देण्याचा उद्योग सुरु असतो. तर राष्ट्र पुरुषांच्या प्रतिमा मलीन करण्याचे कट ही रचले जातात. सारे अंदाज मांडताना जनतेच्या मनात नकळत वस्तुस्थिती पासुन दूर जात मत मत्तांतर होताना दिसते. राजकीय चर्चेत एकमेकांशी नेते कसे भांडतात हे दाखविताना. मात्र, आसुरी आनंद घेत असतात. काही वृत्तपत्रे व चॅनेल हे एका पक्षाची मक्तेदारी करताना दिसतात. या मागे पेड न्युज हा प्रकार वापरला जात असतो. त्यामुळे जनतेच्या मनात या प्रसार माध्यमांविषयी विश्वासहर्ता राहत नाही. म्हणुन अनेकदा भडकावू वृत्त सादर करुन जनतेच्या मनात एकमेकांविषयी आकस निर्माण केला जातो. तर काही न्यायाधिशच बनतात. काही चॅनल वाले व वृत्तपत्रावाले शहीद व पिडिताचे नातेवाईकांच्या दुःखद क्षणी मुलाखती व चित्रण टिपत बसतात आणि मीठ मसाला लावून दाखवत असतात. त्यामुळे संवेदनशीलता पोरकी झाल्यासारखी वाटते.

जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र मोराची चिंचोली...

निवडणुकीचे अंदाज व सत्ता स्थापनेचे अंदाज महाराष्ट्रानी नुकतेच पहिले आहे. यात बोध घेण्यासारखे बरेच काही आहे. जी घटना घडणार नाही तीच सांगून बसणार अशी चित्रणे तयार केली गेली. आता देशात अनेक व्यवस्था आहेत. त्या बदलल्या पाहिजेत निपक्षपणे त्या मांडल्या पाहिजेत. विचारांचा लढा विचारांनी लढला पाहिजे हा संकेत पाळला गेला तर लोकशाहीला धोका होणार नाही.  सध्या अनेक वृत्तपत्रे व चॅनल हे राष्ट् विचारांवर चालत नसुन हे भांडवलदार वर्गाच्या माध्यमातुन चालवली जात आहेत तर सोशल मीडिया हा सध्या प्रभावी माध्यम वापरला जात आहे. परंतु ते नोंदणीकृत, प्रेस कौन्सिलशी सबंधीत नाहीत. त्यामुळे सांगितलेली घटना सत्य असेलच याची खात्री नाही. याच सोशल मीडियावरुन सध्या सर्वात मोठे सायबर व इतर मोठं मोठे गुन्हे व गेम्स सारख्या खेळातुन आत्महत्त्या होत आहेत. तशीच अनेक चांगली कामे ही दिसून येतात. भविष्यात इलेक्टॉनिक मीडियामुळे वाचन संस्कृती नष्ट होईल. रेडिओ इतिहास जमा तर होम थियटर मुळे, पडदा थिएटर बंद पडतील. अशी वाटणारी भीती फोल ठरली आहे. आजही सर्वांचे स्थान भक्कम आहे पण भविष्यात याची खात्री ही देता येत नाही. आजच्या व उद्याच्या भारत निर्मितीतील घटक म्हणुन माध्यमांना इतिहास व समाजमन जागवले पाहिजे. या निमित्त शायर जावेद अखतर यांची शायरी आठवते.

अखेर साप चावल्यावर अघोरी कृत्य करणाऱ्या मांत्रिकावर गुन्हा

जो बात कहते डरते हैं सब, तू वह बात लिख
इतनी अंधेरी थी न कभी पहले रात लिख।
जो रोज़नामों में कहीं पाती नहीं जगह
जो रोज़ हर जगह की है, वह वारदात लिख ।
जी गोष्ट सांगण्याची भीती जनतेच्या मनात आहे ती, अश्या काही अनेक घटना आहेत त्यांना वर्तमानपत्रात जागा नाही. त्या निर्भीड पणे मांडण्याची भूमिका असली पाहिजे. स्वातंत्र्यानंतरही अश्या घटना मूक गीळून गप्प आहेत. त्या मांडण्यासाठी मानवी व लोकशाहीचे मुले जोपासत समाजभिमुख पत्रकारितेची आज नव्याने आवश्यकता आहे. 

Title: Journalism Preservation of human values
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे