कान्हूर मेसाईच्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभकडून मोबाईल

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास मदत व्हावी म्हणून नुकतेच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या दीपस्तंभ या सामाजिक संस्थेकडून मोबाईल देण्यात आलेले असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास मोठी मदत होणार आहे.

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास मदत व्हावी म्हणून नुकतेच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या दीपस्तंभ या सामाजिक संस्थेकडून मोबाईल देण्यात आलेले असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास मोठी मदत होणार आहे.

शिरुर तालुक्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचा मोर्चा

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अडचणी येत असल्याने जळगाव येथील दीपस्तंभ ह्या सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना मोबाईल मिळवून देण्यासाठी प्राचार्य अनिल शिंदे यांनी प्रयत्न करत संस्थेशी संपर्क साधला होता. त्यांनतर नुकतेच सदर संस्थेने दहा विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे जाहीर करत नुकतेच पहिल्या टप्प्यात सदर संस्थेच्या वतीने जयश्री रामदास दळवी, धनश्री धनंजय जाधव व आदित्य गुलाब गायकवाड या तीन विद्यार्थ्यांना मोबाईल संच देण्यात आले.

एका जेष्ठ महिलेला चोरट्यांनी मारहाण अन...

सदर संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी विद्यालयातील २१ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच मिळाले होते, तर सध्या मोबाईल देण्यात येत असल्याने गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दीपस्तंभ संस्था मोलाचा आधार आणि बळ देत असल्याचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी सांगितले. संस्थेच्या सहकार्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांच्या हिताची जपणूक करत असल्याबद्दल विद्यालयाचे अनेक पालकांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Kanhoor Mesaichiya Vidyarthiyana Deepstambhkadoon Mobile