कांताबाई सातारकर यांच्या पाठोपाठ नातवाचा कोरोनामुळे मृत्यू

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. या धक्क्यातून सावरत नाही तेच खेडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संगमनेर : ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले आहे. या धक्क्यातून सावरत नाही तेच खेडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कांताबाई सातारकर यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू अभिजीत ऊर्फ बबलू खेडकर यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांत कुटुंबातील तिघा जणांच्या निधनामुळे खेडकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ख्यातनाम तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन

कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे 25 मे रोजी निधन झाले होते. खेडकर कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अनिता ऊर्फ बेबीताई यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरू असताना आधीच निधन झाले होते. तर नातू अभिजीत ऊर्फ बबलू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अभिजीत यांचे नाशिकमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. कांताबाई सातारकर, कन्या अनिता आणि नातू बबलू तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाने कुटुंबातील तीन सदस्य गेल्यामुळे कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. कांताबाई सातारकर या प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

May be an image of text

युवतीचा मृतदेह शवविच्छेदन विना चार तास रुग्णवाहिकेत...

कांताबाई आणि रघुवीर खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली.

बहिणीच्या दशक्रियेदिवशीच कोरोनाने घेतला भावाचाही बळी...

Image

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

१९६४ मध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला. येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या. त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले होते. दोन वर्षापूर्वी तब्बल ७० वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. संगमनेरमधील एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.

'रुग्णालयाने केवळ पैसे उकळण्यासाठीच केले उपचाराचे नाटक'

तमाशा क्षेत्रातील योगदानासाठी राज्य सरकारने २००५ मध्ये त्यांना पहिला ‘विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवले होते. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आवारात तंबू टाकून सिने, नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला होता. कांताबाईंच्या तमाशाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे.

सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे.

शिरुर तालुक्यातील कोरोना रुग्णाने शेअर केला हॉस्पिटलमधील धक्कादायक अनुभव...

शिरूर रेशनिंग दुकानदार आणि पुरवठा विभाग यांचे आर्थिक साटे-लोटे?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: kantabai satarkars grandson abhijeet khedkar dies corona
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे