कुठेही पाहिलं तरी पवारांचेच नाव सातबारावर असतं...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटाळ्यांवर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होईल. डॉक्युमेंटरी काढायची असेल तर त्यांना २०० ते ३०० कोटींची रॉयल्टी मिळेल.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोटाळ्यांवर नेटफ्लिक्सची डॉक्युमेंटरी होईल. डॉक्युमेंटरी काढायची असेल तर त्यांना २०० ते ३०० कोटींची रॉयल्टी मिळेल. पुण्यात कुठेही पाहिलं तरी पवारांचंच नाव सातबारावर असतं, असे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवून घातला फुलांचा हार...

अजित पवार यांच्या संपत्तीची माहिती घेण्यासाठी सलग 7 दिवस कारवाई सुरू आहे. देशातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या भिंतीच्या आत असणाऱ्या लॉकरमध्ये काही सापडले, सर्व्हट क्वार्टरच्या आत जमिनीतून काही सापडले, असे सांगत त्यांनी पवारांवर चौफेर टीका केली आहे.

अजित पवार यांच्याशी संबंधित 24 ठिकाणी आतापर्यंत धाडी टाकण्यात आल्या असून,  57 जणांची चौकशी झाली आहे. गेल्या चार दिवसांत पवारावर इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू आहेत. पण पैशाची टोटल लागत नाही. पुण्यात कुठेही पाहिलं तरी पवारांचंच नाव सातबारावर असतं. रेकॉर्डवर एवढी संपत्ती असेल, तर प्रत्यक्षात किती असेल, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याचे सभासद आपल्याला येऊन भेटल्याचा दावा सोमय्यांनी केला. 26 हजार सभासदांचा कारखाना काढून घेण्यात आला आणि तेव्हापासूनच या कारखान्याचा मालक कोण, हा सवाल आपण विचारत असल्याचा दावा त्यांनी केला.  अजित पवारांनी अर्थमंत्री असताना लिलाव केला आणि स्वतःच्याच बेनामी कंपनीला तो विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ज्या बेनामी कंपनीने हा कारखाना विकत घेतला, त्याचे संचालक विजया पाटील, त्यांचे पती मोहन पाटील, दुसऱ्या आहेत निता पाटील. या अजित पवारांच्या बहिणी आहेत. त्यामुळे संबंध नसताना बहिणींच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचा अजित पवार यांचा दावा खोटा असल्यांही सोमय्या यांनी म्हटले आहे. आपल्या नावे बेनामी मालमत्ता खरेदी करण्यात आली, याची माहिती अजित पवार यांच्या बहिणींना नाही का, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: kirit somayaa criticizes mva government ajit pawar corruptio