लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर करणार राष्ट्रवादी प्रवेश!

सुरेखा पुणेकर यांनी आपल्या ठसकेबाज लावणीचे राज्यासह परदेशातही अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.

मुंबई: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर पक्षात प्रवेश करणार आहेत.

नाथा शेवाळे यांनी घेतली राज्यपालांची भेट...

सुरेखा पुणेकर या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अखेर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

शिक्रापूर ते वाघाळे रस्त्याचे काम अतिनित्कृष्ठ; कारवाईची मागणी...

दरम्यान, सुरेखा पुणेकर यांनी आपल्या ठसकेबाज लावणीचे राज्यासह परदेशातही अनेक प्रयोग केले आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मराठी बिग बॉसमध्ये असतानाही त्या चर्चेत होत्या. आता त्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: lavni samradni surekha punekar will join ncp shirur taluka n