शिरूर तालुक्यातील डॉक्टरांची पार्टी अन् पोलिसांची धाड...

पोलिस आल्याचे समजताच सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी तेथे पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल 11 डॉक्टर एकत्र येऊन तेथे पार्टी करत असल्याचे आढळून आले.

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी डॉक्टरांच्या एका पार्टीवर कारवाई करत 11 डॉक्टरांसह मोठ्या हॉटेलच्या 2 मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरांच्या पार्टीची परिसरात चर्चा रंगली आहे.

तळेगाव ढमढेरे येथील एका हॉटेलमध्ये काही डॉक्टर गर्दी करून पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन पार्टी करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली.  त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलिस शिपाई विकास यांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिस आल्याचे समजताच सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी तेथे पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल 11 डॉक्टर एकत्र येऊन तेथे पार्टी करत असल्याचे आढळून आले.

याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई विकास मोरे (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर, सणसवाडी तसेच परिसरातील 11 डॉक्टरांसह हॉटेलच्या 2 मालकांवर  गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.

Image may contain: text

Title: lock down time shirur taluka doctor enjoying party police
प्रतिक्रिया (1)
 
Ganesh yadav
Posted on 20 July, 2020

Vikas more saheb. Congratulations Tumhi tumche kartawy chokh pane paar padat aahat Tumchya kartutwala salam