कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरुणाईकडे बघूनच मी जिवंत...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे.

पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे. कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्‍त केले.

लॉकडाऊन बाबत लवकरच मुखमंत्री घेणार निर्णय...

May be an image of text

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्‍तपेढी ससून रुग्णालय यांच्या वतीने रक्‍तदान महाअभियान शिबिराचे आयोजन केले आहे. याची सुरुवात सोमवारी विद्यापीठातील क्रीडा संकुल येथे नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

लॉकडाऊनच्या भीतीने नागरिक धरु लागले गावाचा रस्ता पण...

May be an image of 2 people, outdoors and text that says 'MAK LUBRICANTS MAK सोबत, भारताचा विश्वास ताकद आहे! माझा MAK MAK MAK सोबत, भारताचा विश्वास MAK LUBRICANTS विश्वास आहे! माझा अधिकृत विक्रेते भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार राजलक्ष्मी एंटरप्रायजेस MAK MAK भारत पेट्रोलियम, आपल्या प्रगती चा भागीदार पत्ता पुणे-नगर रोड, शिक्रापूर, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा: 7507321211 9860742122'

यावेळी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. करमळकर यांनी करोनाकाळात रक्‍ताचा तुटवडा असताना सामाजिक जाणिवेतून विद्यापीठ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. यावेळी रक्‍तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सोमवारी (दि. १२) रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी रक्‍तदान केले.

शिरूर तालुक्यातील मोरया हॉस्पिटलचा डॉक्टर निघाला बोगस

May be an image of text that says 'मो.नं. भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

Title: Looking at the youth in the background of Corona I am alive
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे