सर्वसामान्यांना मोठा फटका; महागला गॅस सिलेंडर...

कोरोनामुळे लॉकडाऊन आणि वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन आणि वाढत्या महागाईमध्ये सामान्य जनतेला आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलेंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. याआधी पेट्रोलियम कंपन्यानी 18 ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ केली होती.

पेट्रोल 31 तर डिझेल 96 पैशांनी स्वस्त, पण सीएनजी...

दिल्लीत आता 14.2 किलोग्रॅमच्या विना सब्सिडी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅमच्या LPG Cylinder चा दर 884.50 रुपये इतका झाला आहे. 14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी (non-subsidized LPG) आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 859 वरून 884 रुपये इतका झाला आहे.

शिरूर तालुक्यात लाच स्विकारताना पकडले; गुन्हा दाखल...

>>दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर 884.5 रुपये

>>मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 884.5 रुपये

>>कोलकातामध्ये 911 रुपये

>>चेन्नईत 900.5 रुपये

शिरूर तालुक्यात चोरी करणाऱया टोळीच्या म्होरक्यासह टोळी जेरबंद...

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

शिरुर तहसील कार्यालयातील एजंटगिरी संपणार का ?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: lpg gas cylinder without subsidy price hike from today 1 sep