लुसि कुरियन यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान...

वढू बुद्रुक (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये अनाथ मुलांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांचा नुकताच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व पुणे जिल्हा सेवा दलाच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) सह परिसरातील आदी गावांमध्ये अनाथ मुलांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांचा नुकताच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी व पुणे जिल्हा सेवा दलाच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

तहसीलदार लैला शेख यांचे भय अधिकाऱ्यांना नाही का ?

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे अनाथ, मतीमंद, बेघर मुलांसाठी अग्रेसर असलेल्या माहेर संस्थेच्या वतीने असंख्य अनाथ मुलांना मदतीचा हात पुढे करण्यात आला असताना कोरोना काळामध्ये हजारो गरजूंना किराणा साहित्यांसह जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी कोरोना काळामध्ये महत्वाची कामगिरी बजावण्यासाठी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली माहेर संस्थेने मोलाचे कार्य केलेले असल्याने त्या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा काँग्रेस व पुणे जिल्हा सेवा दलाच्या वतीने सणसवाडी येथील बेघर जेष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या करुणालय प्रकल्प या ठिकाणी लुसि कुरियन यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शिरुर तालुक्यातील संयुक्त पथकांद्वारे होणार कंपन्यांची तपासणी

यावेळी पुणे जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अशोक भुजबळ, काँग्रेसचे शिरुर तालुका अध्यक्ष वैभव यादव, ओबीसी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन नरके, सरचिटणीस श्रीकांत नरके, स्वप्नील शेलार, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, विक्रम भुजबळ, तुकाराम ढोबळे यांसह आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Lucy Kurien honored with Covid Warrior Award
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे