महाराष्ट्र चॅम्पियन संतोष एलभर यांचे कोरोनाने निधन

पै. संतोष यांनी १९९७ साली महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मिळविली होती. त्यांचे वडील पै. गेनभाऊ येलभर, मुलगा पै. आदिनाथ, चुलत बंधू पै. सचिन व मोटेवाडीचे माजी सरपंच पै. संदीप अशी मोठी पैलवनांची फौज एकाच कुटुंबात आहे.

शिरूर: शिरूर तालुक्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले पै. संतोष गेनभाऊ एलभर (वय ४९) यांचे रविवारी (ता. 2) कोरोनाने निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी, चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. संतोष यांच्यावर शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

पै. संतोष यांनी १९९७ साली महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी मिळविली होती. त्यांचे वडील पै. गेनभाऊ येलभर, मुलगा पै. आदिनाथ, चुलत बंधू पै. सचिन व मोटेवाडीचे माजी सरपंच पै. संदीप अशी मोठी पैलवनांची फौज एकाच कुटुंबात आहे. त्यांनी कुस्ती क्षेत्रात दैदिप्यमान अशी कामगिरी केलेली आहे.

मुक्त पत्रकार गणेश थोपटे यांचे कोरोनाने निधन

संतोष एलभर यांचे मूळ गाव शिरूर जवळील मोटेवाडी असून, ते अनेक वर्षांपासून शिरूर येथील करंजुले नगर येथे रहात होते. काही दिवस त्यांनी येथे किराणा मालाचे दुकान चालविले. त्यानंतर रांजणगाव MIDC मध्ये त्यांना ठेकेदारीची कामे मिळाली होती. करंजुले नगर येथील अनेक प्रश्नांच्या निराकारणात व येथील महत्वाच्या जडण घडणींमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

Video: आईला तडफडत असताना मुलीने तोंडाने पुरवला ऑक्सिजन

गेनभाऊ एलभर हे देखील जुन्या पिढीतील एक नावाजलेले पैलवान व माजी सैनिक होते. आपल्या वडिलांकडून कुस्तीचे धडे घेत पै. संतोष एलभर यांनी महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत मजल जिंकली होती. त्यांचे चुलत बंधू पै. सचिन दौलत एलभर यांनी पण पै. संतोष यांच्या पावलावर पाऊल ठेवत, उपमहाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारलेली आहे.

सुजल ड्रायक्लिनची यशस्वी भरारी...

May be an image of text that says 'ग्राहकांच्या उस्फुर्त प्रतिसादानंतर सुजल क्वॉलिटी वॉशिंग कंपनी घेऊन आले आहेत आपल्या सेवेत २ नवीन शाखा शिक्रापुर शाखा अंजिक्यतारा कॉम्लेक्स, शिक्रापुर कोरेगाव भीमा शाखा आंनद एज न्सी समोर, पुणे-नगर रोड, कोरेगाव भीमा शिरूर शाखा: आस्वाद हॉटेल समोर, जैन स्थानक गल्ली, शिरूर पुणे. फॅक्टरी: कात्रज डेअरी शेजारी, लवांडे वस्ती, कोंढापुरी, पुणे www.sujaldryclean.com प्रिमियम ड्राय क्लिनिंग SUJAL QUALITY WASHING COMPANY ÛN& WASHING&S गुणवत्ता हिच आमची ओळख कॉल करा ९१७२९ ४४९७१ जलद सेवा उत्तम गुणवत्ता इको फ्रेण्डली हायजेनिक वॉशिंग'

शिरूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनकच...

शिरुर येथील जैन मंदिराजवळच्या तालमीत त्यांच्यासह अनेक नावाजलेले पैलवान घडले. या तालमीत पै. संतोष एलभर यांनी आपल्या मुलालाही कुस्तीचे प्रशिक्षण दिले. या तालमीचे नूतनीकरण करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. तालमीत नव्यानेच मॅट व इतरही गोष्टींची पूर्तता करण्यात आली होती. पूर्वीच्या मातीतील कुस्त्यांची जागा आता मॅट च्या कुस्त्यांनी घेतल्याने येथेही नवीन पिढीसाठी आधुनिकीकरण केलेले होते. त्या तालमीत पै. संतोष यांचा मुलगा कु. आदिनाथ देखील तालीम घेत आहे. त्यानेही जिल्हा उप केसरी पर्यंत, १७ वर्ष वयोगटात विजेतेपद मिळविलेले आहे.

गणेगावमध्ये पोलिस अधिकारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने उभे राहिले कोविड सेंटर!

May be an image of text

भयानक! अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीबाहेर मोठी रांग...

कोरोना सारख्या साथीच्या रोगाने, अशा नावाजलेल्या पैलवानावर घाला घालत त्यांचा जीव घेतला. परंतु, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेल्या चांगल्या कामांमुळे व मिळविलेल्या यशामुळेच ते सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोशल मीडियावर अनेक मान्यवरांनी व त्यांच्या मोठ्या मित्रपरिवाराने, त्यांना श्रद्धांजली वाहत आपल्या मित्राबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. एका नावाजलेल्या पैलवानाच्या जाण्याने, कुस्ती क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे.

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

May be an image of text that says 'आपली साथ बळीराजाचा विकास farmChome भारत आत्मनिर्भर रानातून पानात नैसर्गिक पद्धतीने जोपासलेला व पारंपारिक पद्धतीने पिकविलेला देवगड येथील, हापूस आंब्याच्या बागेतून चोखंदळ पुणेकर खादय रसिकांच्या दिमतीला मधुर, रसाळ, रানাतুন पानात कोकणचा राजा आलाय.. ४६००/- डझनाची पेटी पोलिसकाका घरपोच सेवा.... वाहतुक खर्च वेगळा चवीनं खाणार त्याला देव देणार 11 9511827050'

Title: maharashtra champion santosh yelbhar passes away corona shir
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे