शिक्रापूर ग्रामपंचायतने घडविला जिल्ह्यात आदर्श...

मागील वर्षी निवडणूक हरलेल्या १७ जणांना बिनविरोध संधी

शिरूर तालुक्यातील निवडणूकीच्या बातम्या मुलाखतींसाठी संपर्क साधाः तेजस फडके- 9766117755 / 9423020103

शिक्रापूर: राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अनेक ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आलेले असताना शिक्रापूर सारख्या मोठ्या अशा सतरा सदस्य संख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. गत वेळी पराभव झालेल्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यात आदर्श निर्माण करून दिला आहे.

बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय नेतेच नाही तर...

Image may contain: 1 person, text that says

शिक्रापूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागील सन २०१५ मध्ये एका मतासाठी तब्बल दहा हजारांच्या मतांच्या दराने निवडणूक गाजली होती. त्यांनतर शिक्रापूर ग्रामपंचायतीला यावेळी बिनविरोध करण्याचा निर्णय गावातील सर्व पुढाऱ्यांनी घेतला आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक घेऊन तोडगा काढला, यावेळी मागील निवडणुकीत हरलेल्या सर्व सतरा उमेदवारांना ग्रामपंचायतीत सदस्यपदाची खुर्ची देण्याचे ठरले. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेली शिक्रापूर ग्रामपंचायत मात्र गावातील सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी आपले वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून हा निर्णय घेतल्याने शिक्रापूर ग्रामस्थांनी संपूर्ण तालुका नव्हे तर जिह्यासाठी हा एकमुखी बिनविरोध निवडणूकीचा आदर्श निर्माण केला आहे.

ग्रामपंचायत बिनविरोधसाठी प्रयत्न करा: वळसे-पाटील

गावातील सर्वात जेष्ठ माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, पोलिस पाटील मोहनशेठ विरोळे, पुणे बाजार समिती संचालक बाळासाहेब चव्हाण, रमेश थोरात, पंढरीनाथ राऊत तसेच गावातील सर्व प्रमुख गावकारभारी यावेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एकत्र आले होते.

शिरुर तालुक्यातील या गावात ग्रामपंचायत निवडणूक होणार पण...

Image may contain: text that says

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकी साठी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही पुन्हा हे सर्व गावकारभारी एकत्र येतील आणि सर्वच सहाही वार्डात निवडणूकीत कुणी उभे राहणार नाही याची दक्षता घेतील. तरीही कुणीही इच्छुकाने गावहित डावलून परस्पर आपला अर्ज ठेवल्यास त्याच्या विरोधात सर्व गाव म्हणून निवडणूक लढविली जाईल असेही यावेळी ठरले गेले. या शिवाय सरपंचपदाचे आरक्षण जसे पडेल तसे पुन्हा सर्व गावकारभारी एकत्र बसतील आणि सरपंच उपसरपंचांचा निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले. अर्थात हे सर्व ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षीने झाले. शिक्रापूरात एकुण मतदान १४ हजार २२५ आहे. यातील ३० टक्के मुळ शिक्रापूरकर तर उर्वरित ७० टक्के बाहेरगावचे रहिवासी शिक्रापूरचे मतदार आहेत. स्थानिक पातळीवर मतदानासाठी पैसे हे स्थानिकांना नाही तर बाहेरच्या मतदारांना वाटावे लागतात. यात फक्त मुळ ग्रामस्थांचाच तोटा असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलले गेले आणि गावासाठी चांगला तर पैशांसाठी चटावलेल्या मतदारांसाठी हिरमोड करणारा निर्णय ठरला आणि बैठकीनंतर एकच जल्लोष करीत अनपेक्षित निर्णय जाहिर झाला.

पॅनलचा खर्च कुणी करायचा? गावपुढाऱ्यांसमोर मोठा प्रश्न...

भैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार का?
शिक्रापूर येथे यापूर्वी एका ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंच पदाच्या निवडणूक साठी दुसऱ्या गटात जाऊन भैरवनाथ मंदिरामध्ये शपथ घेऊन पुन्हा गट बदलणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र नंतर लगेचच गट बदलला त्यामुळे आता भैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बिनविरोध निवडणुक करणाऱ्या गावांना मिळणार लाखोंचा निधी

Image may contain: text that says

शिरूर तालुक्यातील निवडणूकीच्या बातम्या मुलाखतींसाठी संपर्क साधाः तेजस फडके- 9766117755 / 9423020103

Title: maharashtra politics positive news shikrapur gram panchayat
प्रतिक्रिया (1)
 
Sudesh Dhekane
Posted on 30 December, 2020

What up number ahe group la add kara Shirurtaluka.com group

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे