मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

जातेगाव येथील व्यक्तीच्या नावावर परस्पर काढले शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह....

शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या तीन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केलेले असताना सध्या मंगलदास बांदल पोलिस कोठडीत असताना आता पुन्हा मंगलदास बांदल व त्यांच्या दोन साथीदारांवर एका व्यक्तीच्या परस्पर सदर व्यक्तीच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा मंगलदास बांदल व त्यांच्या दोन साथीदारांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

Image

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या सह एका अनोळखी व्यक्तीवर शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करून बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल एक कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता दोन कोटी पन्नास लाख रुपये थकवत फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. यावेळी शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली होती.

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

दरम्यान, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले असताना आता जातेगाव बुद्रुक येथील रवींद्र सातपुते या व्यक्तीला शिवाजीराव भोसले बँके बाबत काहीही माहिती नसताना मंगलदास बांदल, गुलाब पवार व दिनेश कामठे यांनी सातपुते याचे ओळखपत्र व इतर कागदपत्रांचा वापर करून सातपुते यांच्या खोट्या सह्या करून बँकेचे कर्ज काढले. मात्र, कर्ज काढल्यानंतर अनेक दिवसांनी सातपुते यांना याबाबत माहिती झाले व आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

Image

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

शिक्रापूर पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले असल्याने रवींद्र सातपुते (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पै. मंगलदास विठ्ठल बांदल, गुलाब दशरथ पवार (दोघे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) व दिनेश जयसिंग कामठे (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहेत.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

'शिरुर तालुका डॉट कॉम'च्या बातमी नंतर अधिकाऱ्यांची भागम भाग

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Mangaldas Bandal again charged with fraud