मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी वाढ

शिरूरमधील ठाण्यातील १४ दिवस आणि पुणे शहर पोलिस ठाण्यातील ८ दिवस असे महिनाभरातील तब्बल २२ दिवस हे मंगलदास बांदल यांचे पोलिस कोठडीत जाणार आहेत.

पुणे : शिरूर पोलिस ठाण्यात तब्बल १४ दिवस पोलिस कोठडीत राहावे लागलेले पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील बनावट कर्ज प्रकरण व बॅंकेचे 50 लाख रुपये आपल्या खात्यात टाकल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी (ता. १७) बांदल यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या आर्थिक घोटाळ्यामध्ये बांदल यांचाही सहभाग असल्याचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले होते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडूनही बांदल यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश वाळके यांच्या पथकाने गुरुवारी बांदल यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्यांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमध्ये बांदल यांनी बनावट कर्ज प्रकरणे दाखल करुन कर्ज लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर संबंधीत बॅंकेचे 52 लाख रुपये बांदल यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बांदल यांना अटक केली आहे.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

May be an image of text that says

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

पुण्यातील एका बड्या सराफी व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये मंगलदास बांदल यांना मागील वर्षी पुणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात फसवणूकप्रकरणी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी बांदल यांना २६ मे रोजी अटक केली होती. त्या गुन्ह्यात त्यांना १ जूनपर्यंत पोलिस कोठडीत राहावे लागले होते. ही कोठडी पूर्ण होताच, बांदल यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात बांदल यांना तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

या प्रकरणाचा तपास चालू असतानाच रवींद्र सातपुते यांच्या तक्रारीवरून ८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत राहावे लागले होते. बांदल यांना ८ जून रोजी तीनही गुन्ह्यांत शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून बांदल यांना येरवडा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, शिरूरमधील ठाण्यातील १४ दिवस आणि पुणे शहर पोलिस ठाण्यातील ८ दिवस असे महिनाभरातील तब्बल २२ दिवस हे मंगलदास बांदल यांचे पोलिस कोठडीत जाणार आहेत.

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: mangaldas bandal arrested pune police economic crime branch