मंगलदास बांदल यांना साथ देणाऱया माजी सरपंचासह तिघांना अटक

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना या गैरव्यवहारात साथ देणाऱया आणखी तीन जणांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

शिक्रापूर: शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणात अटक असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना या गैरव्यवहारात साथ देणाऱया आणखी तीन जणांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये वाफगाव (ता. खेड) येथील माजी सरपंचाचा समावेश आहे, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी वाढ

मंगलदास बांदल यांना फसवणूक प्रकरणात कुलमुखत्यार पत्र करताना सहाय्य करणे हे वाफगावच्या माजी सरपंचांसह तिघांना चांगले अंगलट आले आहे. कुलमुखत्यार पत्रात या तीनही संशयित आरोपींचा समावेश असल्याने त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

फिर्यादी दत्तात्रेय रावसाहेब मांढरे (रा. शिक्रापूर) यांच्या तक्रारीवरून गेल्या महिन्यात माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात बांदलांसह आणखी दोघे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याच प्रकरणी आता संजय शिवाजीराव शितोळे-सरकार (रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर), विकास नामदेव कराळे (रा. वाफगाव, ता. खेड) आणि गोविंद शंकर झगडे (रा. धानोरे, ता. शिरूर) यांना शिक्रापूर पोलिसांनी सोमवारी (ता. २८) अटक केली आहे.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

विकास कराळे हे वाफगाव (ता. खेड) येथील माजी सरपंच असून, संजय शितोळे-सरकार हे पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील आहेत, अशी माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. मांढरे यांच्या फसवणूक प्रकरणात बनावट कुलमुखत्यार पत्रात या तीनही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. बनावट कागदपत्रांद्वारे मूळ १ कोटी २५ लाखांच्या कर्जाचे हप्ते न भरल्याने वाढलेल्या २ कोटी ५० लाख रुपये रकमेच्या थकबाकीवरून मांढरे यांनी तक्रार दाखल केल्याने या प्रकरणात आता अटक आरोपींची संख्या सहावर पोचली आहे. शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: mangaldas bandal help former sarpanch and 2 other arrested