मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

बँकेचे फसवणूक प्रकरण बांदल यांच्या चांगलेच आले अंगलट

मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या पत्नी रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या काही साथीदारांवर बँकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हे होत शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केलेले अनेक दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर मंगलदास बांदल यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरुर न्यायालयाने दिले असल्याने मंगलदास बांदल यांची रवानगी येरावडा कारागृहात करण्यात येणार आहे.

शिक्रापूर: पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्या सह त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल व त्यांच्या काही साथीदारांवर बँकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हे होत शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केलेले अनेक दिवसांच्या पोलीस कोठडी नंतर मंगलदास बांदल यांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरुर न्यायालयाने दिले असल्याने मंगलदास बांदल यांची रवानगी येरावडा कारागृहात करण्यात येणार आहे.

शिरुरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार लैला शेख आता गप्प का?

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांच्यासह त्यांच्या जिल्हा परिषद सदस्या रेखा मंगलदास बांदल आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर २६ मे २०२१ रोजी शिक्रापूर येथील एका व्यक्तीच्या जागेतील गाळ्यांचे बनावट व्यक्ती उभी करुन बोगस गहाणखत बनवून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे तब्बल १ कोटी २५ लाख रुपये कर्ज काढून बँकेचे कर्ज न भरता २ कोटी ५० लाख रुपये थकवत फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.

कोरेगाव भीमा येथे शासकीय नियम तुडविले पायदळी

दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना अटक केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यावेळी न्यायलयाने मंगलदास बांदल यांना एकामागे एक अनेक दिवस पोलीस कोठडी सुनावली असताना पोलीस कोठडीत असतानाच बांदल यांच्यावर फसवणुकीचे अजून २ गुन्हे वाढल्याने बांदल जास्त अडचणीत सापडले, तर यावेळी पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने बांदल यांच्या शिक्रापूर येथील २ व हडपसर एका बंगल्या ६ त्यांच्या एका कंपनीची कसून तपासणी करत झडती घेतली होती.

कोरेगाव भीमा येथील वाईनशॉप मालकाच्या नवीन कारची मोठी पूजा अडचणीत...

परंतु यावेळी काहीही मिळून आले नाही, तर न्यायालयाने पोलिसांच्या तपासाच्या मागणीसाठी बांदल यांना एकामागे एक असे वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी अनेक दिवस पोलीस कोठडी दिली होती. तर सध्या त्यांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभागी असलेले काही सहकारी फरार झालेले आहेत, तर काही सहभागी सहकारी यापूर्वीच येरावडा कारागृहात गेलेले असून न्यायालयाने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान मंगलदास बांदल यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने त्यांची रवानगी येरावडा कारागृहात करण्यात येणार आहे.

शिरूर तालुक्यातून चोरी झालेली फॉरच्यूनर सापडली राजस्थानात पण...

मात्र येरावडा कारागृहाच्या सध्याच्या कोविड काळातील नियमानुसार बांदल यांची कोविड तपासणी करण्यात आलेली असल्याने त्यांचा कोविड तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगलदास बांदल यांना येरावडा कारागृहात दाखल करण्यात येणार आहे. मात्र सध्याच्या या घडामोडी मूळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Mangaldas Bandal ordered to be sent to Yerawada Jail
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे