मंगलदास बांदलच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला...

शिवाजीराव भोसले बँक बनावट कर्ज प्रकरण

शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना तातडीने अटक केली होती तर रेखा बांदल या फरार झाल्या होत्या. दरम्यान जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका गाळेधारकाच्या गाळ्यांचे बनावट कुलमुखत्यार दस्त व पुरवणी दस्त तयार करुन पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतून सव्वा कोटींचे कर्ज घेत गाळेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला आहे.

मंगलदास बांदल व शिवाजीराव भोसले बँक प्रकरणात तिघा अधिकाऱ्यांना अटक

शिक्रापूर येथील दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या गाळ्यांचे बनावट कुलमुखत्यार दस्त व पुरवणी दस्त तयार करुन राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी प्रदेश उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल याची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज काढून बँकेचे सव्वा दोन कोटी रुपये कर्ज थकविले होते. याबाबत दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असता मंगलदास बांदल व रेखा बांदल यांच्या सह सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मंगलदास बांदल यांना साथ देणाऱया माजी सरपंचासह तिघांना अटक

दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास बांदल यांना तातडीने अटक केली होती तर रेखा बांदल या फरार झाल्या होत्या. दरम्यान जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला असून, सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मंगलदास बांदल आहे, ते अर्जदार रेखा बांदल यांचे पती आहे. त्याने अन्य संशयितासोबत मिळून फिर्यादीच्या संमतीशिवाय त्याच्या नावावरील गाळ्यांचे बनावट पुरवणी दस्त तयार करत त्या आधारे शिवाजीनगर भोसले सहकारी बॅंकेतून सव्वा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले.

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी वाढ

संशियितांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी संगनमताने हा गंभीर गुन्हा केला आहे. त्यांना जामीन झाल्यास गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, त्यामुळे जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. कावेडीया यांनी केली असताना न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

मंगलदास बांदल यांना चार दिवसाची पोलिस कोठडी

...म्हणून मंगलदास बांदल यांना अटक

माझ्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे: मंगलदास बांदल

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक

जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: mangaldas bandal wife rekha bandal bank fruad case court