माणुसकीचे उगमस्थान म्हणजेच शेरखान शेख

शेरखान शेख हे शिक्रापूर येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले युवक त्यांना प्राणी, पक्षी आणि निसर्गाविषयी प्रेम असून ते सर्पमित्र व प्राणीमित्र आहेत. आज पर्यंत हजारो साप, वन्य जीव तसेच कत्तलीसाठी चाललेल्या आपल्या गोमाता व जनावरांना त्यांनी जीवदान दिले.

शेरखान शेख हे शिक्रापूर येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले युवक त्यांना प्राणी, पक्षी आणि निसर्गाविषयी प्रेम असून ते सर्पमित्र व प्राणीमित्र आहेत. आज पर्यंत हजारो साप, वन्य जीव तसेच कत्तलीसाठी चाललेल्या आपल्या गोमाता व जनावरांना त्यांनी जीवदान दिले. निसर्ग सेवा करत असताना ते समाजसेवा देखील तितक्याच आदबिने करतात. मग रस्ता भटकलेल्या कुटुंबाला घरी सोडवण्याचा असो, त्यांच्या अन्न, वस्त्र निवाऱ्याचा किंवा त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय असो शेरखान शेख हे होता होईल तेवढं स्वतःला या कार्यात झोकुन देतात. कारण ते नेहमी म्हणतात आपण समाजाचे काही तरी देणं लागतो. हे सगळं करत असताना ते कोणाकडूनच मदतीची अपेक्षा ठेवत नाही किंवा कोणी सोबत यायची वाट देखील पाहत नाहीत जे आहेत त्यांच्या सोबत जे नाहीत त्यांच्या शिवाय ते कार्य करत असतात.

सैनिक संघटनेकडून मिळाला वीर पत्नीला न्याय...

शेरखान शेख हे स्वतः एक उत्कृष्ट, निर्भीड व धडाडीचे पत्रकार म्हणून संपूर्ण शिरुर तालुक्यात ओळखले जातात. समाजातील सुख सुविधांपासुन वंचित असणाऱ्या घटकांना त्यांनी जगा पुढे आणले आहे. समाजात कित्येक लोक आपले कार्य करत असतात. परंतु त्यांची कामे समाजाला कळत नाहीत, तर अशा किती तरी लोकांना त्यांनी लोकप्रिय केले असून त्यापैकी मी देखील एक आहे. शेरखान शेख हे सर्व करत असताना त्यांना कोणत्या गोष्टीबद्दल कसल्याही प्रकारचा गर्व, मोह, मत्सर नाही. कित्येक वेळेस त्यांनी मदत केलेल्या काही लोकांनीच त्यांच्या भोळ्या मनाचा फायदा घेतला असल्याच्या घटना घडल्या. परंतु त्यांच्या बाबत वाईट अथवा वाईट करण्याचा विचार शेरखान यांनी मनात आणला नाही हा त्यांच्या साधेपणाचा उत्तम नमुना आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच काही दिवसांत शेरखान यांच्या पत्रकारितेला १० वर्ष पुर्ण होतील. परंतु शेरखान यांनी कधीही आपल्या पत्रकारिता तसेच पदाचा गैरफायदा घेतला नाही. त्यांच्या या कारकीर्दीत कोणतीही बातमी असो ती त्यांनी स्वतः आढावा घेऊन त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी करुनच केलेली आहे आणि याची कबुली देखील खुद्द शेरखान शेख यांना मुलगा मानणाऱ्या जगातील शंभर प्रेरणादायी व्यक्तींमधील बाराव्या क्रमांकाच्या असलेल्या माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन (दिदी) यांनी एका कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिली आहे.

लहान मुले खेळता-खेळता तळ्याजवळ गेली अन्...

आपल्या क्षेत्रातील सर्व गोष्टी करत असताना शेरखान यांना समाजातील सर्वच क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींचा विरोध पत्करावा लागतो. मात्र ते त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या जनसमुदाय व लोकांच्या आशीर्वादामुळे कधी डगमगून न जाता परिस्थितीशी २ हात करत असतात. शेरखान हे एखाद्या चुकीच्या गोष्टी विरोधात आवाज उठवायचा म्हणलं तर आर नाही तर पार ची भुमिका घेतात व या सर्व गोष्टींला तोंड देण्यासाठी तशी त्यांची प्रतिमा देखील भक्कम आहे मग ती राजकीय वर्तुळात असो, सामाजिक क्षेत्रात असो की सरकारी कार्यालयात सर्वच पुढारी, नेते व सरकारी पदाधिकाऱ्यांकडून शेरखान यांच्या कामामुळे नेहमीच कौतुक होत असते. शेरखान यांना असंख्य पुरस्कार, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्हे मिळाली आहेत. त्यांच्या घरी आलेली प्रत्येक व्यक्ती हे सर्व पाहून भारावून जाते. पैशाने सर्व काही विकत घेता येते पण समाजातील असलेली इज्जत नाही. त्यामुळे हे पुरस्कार व सन्मानचिन्हे त्यांच्यासाठी खरी संपत्ती असल्याचे शेरखान शेख नेहमी म्हणतात. शेरखान बद्दल बोलताना त्यांचे काही विरोधक त्यांच्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी समाजात पसरवतात आणि या गोष्टी स्वतः मला देखील सांगण्यात आलेल्या होत्या. परंतु शेरखान यांना भेटल्यानंतर झालेला गैरसमज नष्ट झाल्याशिवाय राहत नाही याची प्रचिती देखील मला आली आहे. शेरखान शेख यांच्याबाबत बोलावे तेवढे कमीच आहे. मात्र त्यांचा स्वभाव हा त्यांच्या जवळच्या माणसांनाच समजतो, मी ही त्यांच्या जवळच्या व्यक्तींमधील एक असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो..

सणसवाडीत वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; गालावर तीळ...

अशाप्रकारे आदर्श पत्रकार शेरखान शेख नेहमीच आपल्या निस्वार्थी सेवेतून समाजाला एक वेगळाच संदेश देऊन जातात आणि दगडासारख्या व्यक्तींना देखील माणुस म्हणुन जगायला शिकवून निसर्गावर व समाजावर प्रेम करण्यास भाग पाडतात.

शब्दांकन- श्रीकांत बाळासाहेब भाडळे.
(अध्यक्ष वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्था)

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Manusaki s origin place Manzech Sherkhan Sheikh