अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

बिग बॉस मराठीची पहिली विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिने निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची एंट्री झाली होती तेव्हा त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती.

मुंबई : मराठी बिग बॉस फेम आणि प्रसिद्ध विनोदी अभिनेता भूषण कडू ची पत्नी कांदबरी कडू यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या 39 वर्षांच्या होत्या. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

बहिणीच्या दशक्रियेदिवशीच कोरोनाने घेतला भावाचाही बळी...

अभिनेता भूषण कडू याची पत्नी कांदबरी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातील त्यांच्यावर ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. पण, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पत्नी कांदबरीच्या निधनामुळे कडू कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. भूषण यांना प्रर्किर्थ कडू हा 7 वर्षांचा मुलगा आहे. कादंबरी या भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या.

शिरूर तालुक्यात कोरोनाने पुन्हा घेतला सख्या भावांचा बळी

झुंज अपयशी, अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूने मलठण गहिवरले...

विनोदी अभिनेता म्हणून भूषण कडू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित चेहरा आहे. अनेक चित्रपट, नाट्य आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडी एक्स्प्रेस या मालिकेमधून भूषण कडूने सर्वांना खळखळून हसवले. कलर्स वाहिनीवरील मराठीतील पहिल्या बिग बॉसमध्ये भूषण कडूने आपली दखल घेण्यास सर्वांना भाग पाडले होते.

हृदयद्रावकः कारेगावमधील तीन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

May be an image of text

मराठी बिग बॉसच्या एका भागात कांदबरी आणि त्यांच्या मुलाची भेट दाखवण्यात आली होती. बिग बॉस मराठीची पहिली विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे हिने कांदबरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बिग बॉसच्या घरात त्यांची एंट्री झाली होती तेव्हा त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. भूषण इकडे असताना बाहेर तिने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती' अशी भावना मेघा धाडेने व्यक्त केली आहे.

बाभूळसर बुद्रुक येथील दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

Image

डॉ. अंकुश लवांडे यांनी दिल्या कोरोनावर महत्त्वाच्या टिप्स...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: marathi actor bhushan kadus wife kandbari kadu dies corona
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे