गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश; दिली महत्वाची जबाबदारी

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

मुंबई: प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली माडे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशाली हिने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केले आहे.

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा

वैशाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. ही परिस्थिती बघून, वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर आज (गुरुवार) प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

वैशालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तिचे स्वागत केले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत वैशालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोठी बातमी! शरद पवार यांच्या भेटीला देवेद्र फडणवीस...

Image

मंगलदास बांदल यांच्या बंगल्यांची पोलिसांकडून झाडाझडती

वैशाली माडे ही महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका आहे. मराठीसोबतच तिने बॉलिवूडमध्ये सुद्धा आपले कसब दाखवले आहे. झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या शोची 2009 ची ती विजेती आहे. त्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती. मनोरंजन क्षेत्रात अगदी कमी वयात तिने स्वतःचं एक विशेष स्थान निर्माण केले आहे. बाजीराव मस्तानी या या चित्रपटातील पिंगा हे तिचं गाणे खुपचं प्रसिद्ध झाले होतं. तसेच तिने अलीकडेच आलेल्या कलंक या चित्रपटात देखील गाणे म्हटल आहे.

डॉक्टरमधील 'देवमाणसा'चे कौतुक करूयात तर 'बोगस' डॉक्टरांचे बिंग फोडूया...

'शिरुर तालुका डॉट कॉम'च्या बातमी नंतर अधिकाऱ्यांची भागम भाग

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: marathi famous singer vaishali made join to ncp at mumbai
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे